World Cup 2023 : फायनलपूर्वी सारा तेंडुलकर हिचा शुबमन गिल याला खास मेसेज; म्हणते, ‘फायनल गेम…’

| Updated on: Nov 19, 2023 | 3:07 PM

World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलपूर्वी सारा तेंडुलकर हिचा क्रिकेटपटू शुबमन गिला याला खास मेसेज... एक फोटो पोस्ट करत म्हणाली, 'फायनल गेम...'; सध्या सर्वत्र वर्ल्ड कप आणि सारा तेंडुलकर हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा..., साराच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव

World Cup 2023 : फायनलपूर्वी सारा तेंडुलकर हिचा शुबमन गिल याला खास मेसेज; म्हणते, फायनल गेम...
Follow us on

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : क्रिकेट वर्ल्ड कप 2023 (Cricket World Cup 2023) फायनल पाहण्यासाठी फक्त क्रिकेटचे चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील उत्सुक आहेत. आता काही वेळातच भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia Match) मध्ये सामना रंगणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याची चर्चा रंगली आहे. भारताचा वियज व्हावा म्हणून संपूर्ण देशात चाहते पूजा करत साकडं घालत आहेत. तर क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर हिने क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासाठी खास मेसेज पाठवला आहे. स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट करत सारा हिने शुबमन गिल याला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

एक्स (ट्विटर)वर स्वतःचा फोटो पोस्ट करत सारा म्हणाला, ‘फायनलसाठी आम्ही तेथे असू… शुबमन गिल उत्तम खेळ…’ असं सारा म्हणाली आहे. एवढंच नाही तर, सारा हिने शुबमन गिल याला पोस्टमध्ये टॅग देखील केलं आहे. शिवाय सारा हिने हार्ट इमोजी देखील शेयर केली आहे. चाहते देखील सारा हिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पण साराच्या नावाचं पॅरोडी एक्स (ट्विटर) अकाउंट आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

क्रिकेट वर्ल्ड कप 2023 दरम्यान सारा आणि शुबमन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, सारा आणि शुबमन अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. पण सारा आणि शुबमन यांना त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सारा आणि शुबमन यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु असताना क्रिकेटपटू चिराग सूरी याचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये चिराग सूरी सारा आणि शुबमन यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहे. चिराग सूरी याला ‘शुबमन गिल याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आलं..’ तेव्हा चिराग सूरी म्हणाला, ‘शुबमन याची एक गर्लफ्रेंड आहे आणि तिचं नाव सारा आहे.. सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा…’ आता सारा आणि शुबमन कधी त्यांच्या नात्याचा सर्वासमोर स्वीकार करतील याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील सारा हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.