क्रिकेटर विराट कोहली हा T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना दिसला. यानंतर विराट संघासोबत भारतामध्ये परतला आणि लगेचच अनुष्का शर्मा आणि आपल्या मुलाला आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला गेला. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे की, विराट कोहली हा लंडनमध्येच शिफ्ट होणार आहे. अनुष्का शर्मा हिने मुलाला जन्म देखील लंडनमध्येच दिलाय. मात्र, खरोखरच विराट कोहली आणि अनुष्का लंडनमध्येच कायमचे राहणार की, नाही? यावर अजूनही काही खुलासा होऊ शकला नाहीये. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याची चर्चा असतानाच आता विराटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. हेच नाहीतर विराट कोहली याने चक्क आपल्या घराची झलक दाखवलीये. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे हे घर अत्यंत आलिशान असल्याचे बघायला मिळतंय. अनेक सुविधा या घरात आहेत. मोठा स्विमिंग पूलही बघायला मिळतोय.
व्हिडीओमध्ये विराट कोहली घराच्या विविध भागांमध्ये फिरताना दिसतोय. एक मोठा हॉल सुरूवातीला दिसतोय. यासोबतच विराट आणि अनुष्काच्या घरातील किचन देखील दिसत आहे. मस्त हवेशीर बसून जेवणासाठी खास टेबल देखील आहे. यासोबतच गार्डन परिसरात व्यायाम करताना विराट कोहली हा दिसत आहे. अत्यंत खास प्रकारे हे घर डिझाईन करण्यात आल्याचे बघायला मिळतंय.
विशेष म्हणजे ज्यावेळी घराचे बांधकाम सुरू होते, त्यावेळीही विराट कोहली पाहणी करण्यासाठी तिथेच पोहोचल्याचे व्हिडीओमध्ये आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या स्वप्नातील हे घर असल्याचे बघायला मिळतंय. आपल्या घराबद्दल माहिती सांगताना विराट कोहली हा व्हिडीओमध्ये दिसत आहे. हॉलिडेमध्ये राहण्यासाठी हे घर अगदी बरोबर आहे.
विशेष म्हणजे हे अत्यंत खास असे घर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे मुंबईच्या अत्यंत जवळ आलिबाग येथेच आहे. आता विराट कोहली याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. विराट कोहली याच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कधीच त्यांच्या मुलाचा आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाहीये.