‘ॲनिमल’ सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तृप्तीच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तृप्ती हिला बोलावण्यात आलं होतं. पण अभिनेत्री पैसे घेवून कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचली नाही. त्यामुळे अनेकांनी तप्तीवर संताप व्यक्त केला आहे. शिवाय तिच्यावर बहिष्कार टाका… असं देखील लोकं म्हणत आहेत. शिवाय अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करू… अशी देखील धमकी दिला आहे.
व्हिडीओमध्ये एक महिला संताप व्यक्त म्हणते, ‘कोणीही हिचे सिनेमे पाहाणार नाही. आधी शब्द देतात आणि त्यानंतर येत नाहीत. वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. ही कोणती मोठी सेलिब्रिटी आहे? कोणाला माहिती हिचं नाव देखील माहिती नाही. आम्हाला पाहायचं होतं ही नक्की आहे तरी कोण? स्वतःला सेलिब्रिटी बोलावून घेण्याची तिची लायकी नाही…’ असं देखील व्हिडीओमध्ये महिला बोलताना दिसत आहे.
This is so bad, ya! Just because #TriptiiDimri is a celeb that doesnt give anyone the right to do such things for a meagre 5 L.
Not only her, many actors will be scared to attend ficci flo’s events #VickyVidyaKaWohWalaVideo
— Bollywood Talkies (@bolly_talkies) October 1, 2024
व्हिडीओमध्ये महिला तृप्ती हिच्या तोंडाला काळं लावताना दिसत आहे. अन्य एक महिला म्हणाली, ‘तृप्तीवर बहिष्कार टाकायला हवाय. आम्ही तिच्यावर केस करणार आहे. मी तिला अर्धे पैसै ट्रांसफर केले होते. अर्धे पैसे द्यायचे बाकी होती. मी 5 मिनिटांत कार्यक्रम स्थळी पोहोचते असं देखील ती म्हणाली होती. पूर्ण करार 5.5 लाख रुपयांचा झाला होता. तिने आज आमचा अपमान केला आहे.’ असं म्हणत महिलांनी तृप्ती विरोधात संताप व्यक्त केला.
तृप्ती डिमरीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर तृप्ती ‘भूल भूलैय्या 3’ मध्ये आणि ‘धडक 2’ मध्ये देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.