BB OTT 2: सायरस ब्रोचा याने ‘बिग बॉस ओटीटी 2’ शोचा घेतला निरोप, का रंगत आहेत अनेक चर्चा?

| Updated on: Jul 10, 2023 | 5:25 PM

सायरस ब्रोचा कोणत्या कारणामुळे निघला 'बिग बॉस ओटीटी 2'च्या घरा बाहेर? चाहत्यांनी देखील उपस्थित केले अनेक प्रश्न... सध्या सर्वत्र 'बिग बॉस ओटीटी 2'च्या दमदार स्पर्धकाची चर्चा...

BB OTT 2: सायरस ब्रोचा याने बिग बॉस ओटीटी 2 शोचा घेतला निरोप, का रंगत आहेत अनेक चर्चा?
Follow us on

मुंबई | सध्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘बिग बॉस ओटीटी २’ शोची चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ शोची वाढती लोकप्रियता पाहता शो आणखी दोन आठवडे पुढे सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, शोचा होस्ट सलमान खानने विकेंड का वारमध्ये कोणाच्याही एव्हिक्शनची घोषणा केलेली नाही. तरी देखील एक स्पर्धक शोमधून बाहेर गेला आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ चा दमदार स्पर्धक सायरस ब्रोचा याने प्रकृतीच्या समस्यांमुळे घरातून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण सलमान खान याने सायरल याला नकार दिला.

वीकेंड का वारमध्येही सायरसने सलमान खानला विनंती केली होती की तो शोमध्ये जेवू शकत नाही किंवा झोपू शकत नाही. म्हणून त्याला घर सोडायचं आहे. मात्र, सलमान खानने त्याला शो सोडण्याची परवानगी दिली नाही. त्यावर सायरसने दंड भरण्यासाठी देखील तयारी दाखवली.

हे सुद्धा वाचा

 

 

सलमान खान याला विनंती करत सायरस म्हणाला, ‘मला झोप येत नाही. मी रात्री तीन तास झोपतो. सकाळी उठतो वर्कआऊट करतो. मी परिस्थिती सांभाळू शकत नाही.’ यावर सलमान खान म्हणतो, ‘हे सर्व करारा विरोधात आहे. तुम्ही करार मान्य केल्यामुळे चॅनल तुम्हाला बाहेर काढू शकेल असे मला वाटत नाही. हे असे चालत नाही, शो तुमच्या इच्छेनुसार, आवडीनुसार चालत नाही..” असं सलमान खान याने सायरल याला खडसावून सांगितलं..

अशात सायरल लाईव्ह फीडमध्ये दिसत नसल्यामुळे नेटकरी देखील सोशल मीडियाच्यामध्यमातून एव्हिक्शनबबतीत पोस्ट करत आहेत. सायरसला अद्याप अधिकृतपणे शोमधून बाहेर काढण्यात आलेले नाही. आता सायरसला त्याच्या प्रकृती समस्यांमुळे ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तर सायरसच्या फॅनपेजवरुन देखील चाहते अनेक प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘बिग बॉस ओटीटी २’ शोची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असल्यामुळे शो दोन आठवडे आणखी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ शोचा फिनाले आता १३ ऑगस्ट रोजी असणार आहे. आतापर्यंत शोमधून पुनीत सुपरस्टार, आकांक्षा पुरी, आलिया सिद्दीकी आणि पलक पुरस्वानी बाहेर पडले आहेत.