मुंबई : मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा ग्रँड फिनाले आज पार पडला आहे. तब्बल 28 वर्षांनंतर भारताला मिस वर्ल्डचे आयोजन करण्याची मोठी संधी मिळाली. हा फिनाले मुंबईतील सर्वात खास ठिकाणी पार पडला. या फिनालेकडे संपूर्ण जगाच्या नजरा या लागल्या होत्या. या फिनालेला फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक उपस्थित राहिले. या सोहळ्यात कलाकार हे धमाल करताना दिसले. या फिनालेमध्ये करण जोहर हा सूत्रसंचालन करताना दिसला. बाॅलिवूड कलाकारांनी या फिनालेमध्ये धमाल केली.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्डमध्ये या फिनालेचे खास आयोजन करण्यात आले. शेवटी मिस वर्ल्ड 2024 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. क्रिस्टीना पिजकोव्हा हिने मिस वर्ल्डचा किताब मिळवा आहे. क्रिस्टीना पिजकोव्हा हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.
भारताची सिनी शेट्टी टॉप 4 मधून बाहेर पडली. सिनी शेट्टी हिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सिनी शेट्टी हिला सपोर्ट करताना लोक दिसले. मात्र, सिनी शेट्टी ही टॉप 4 मधून बाहेर पडली. या फिनालेकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या. शेवटी विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीये.
क्रिस्टीना पिजकोव्हा हिने मिस वर्ल्डचा क्राउन अखेर आपल्या नावावर केला आहे. क्रिस्टीना पिजकोव्हा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. यास्मीना फर्स्ट ही रनर अप ठरली आहे. या फिनालेची शान वाढवण्यासाठी नेहा कक्कर आणि टोनी कक्कर हे देखील या मंचावर परफॉर्म करताना दिसले आहे.