दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड 2023 साठी सेलिब्रिटींची मांदियाळी; शनिवारी रंगणार पुरस्कार सोहळा

| Updated on: May 19, 2023 | 5:45 PM

सेलिब्रिटी आणि त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्याचं आयोजन... मोठ्या जल्लोषात पार पडणार पुरस्कार सोहळा

दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड 2023 साठी सेलिब्रिटींची मांदियाळी; शनिवारी रंगणार पुरस्कार सोहळा
Follow us on

Dada Saheb Phalke Film Foundation Award : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे कलाकारांसाठी पुरस्कार सोहळ्याचं महत्त्व फार मोठं असतं. आपण केलेल्या कामाची पोचपावती कलाकारांना पुरस्काराच्या माध्यमातून मिळते. पुरस्कार सेलिब्रिटी आणि मनोरंजनाशी संबंधित लोकांचे धैर्य वाढवतात. त्यांना मनापासून काम करण्यासाठी आणखी उत्साहित करतात. अशात सेलिब्रिटी आणि त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी उद्या म्हणजे २० मे रोजी दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळा शनिवारी संध्याकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. मानाचा समजला जाणाऱ्या सोहळ्याचं आयोजन एमपी ऑडिटोरियम, जेव्हीपीडी स्कीम, विलेपार्ले पश्चिम, मुंबई याठिकाणी करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर, टीव्ही विश्वातील कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यांमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला, कार्तिक आर्यन यांसारखे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहिले होते.

सांगायचं झालं तर शनिवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील कलाकारांचा आणि त्यांच्या कार्या सन्मान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन अवॉर्डच्या ज्युरी मेंबर्सबद्दल बोलायचे झाले तर इंडस्ट्रीशी निगडित लोकांचीही नावे यात समाविष्ट आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या चार श्रेणींवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. याशिवाय अन्य श्रेणींसाठी देखील सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदाण करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यासोबतच अनेक अभिनेते आणि अभिनेत्री परफॉर्म देखील करणार आहेत. सध्या सर्वत्र दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु आहे.