Dadasaheb Phalke Award | दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

| Updated on: Sep 27, 2023 | 9:23 AM

Dadasaheb Phalke Award | ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सध्या सर्वत्र वहिदा रहमान यांची चर्चा सुरु आहे.

Dadasaheb Phalke Award | दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
Follow us on

मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आता ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वहिदा रहमान यांनी ६० – ७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘सीआयडी’पासून ‘गाईड’पर्यंत या दोघांनी अनेक उत्तम चित्रपट एकत्र केले आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अनुराग ठाकूर ट्विट करत म्हणाले, ‘वहिदा रहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो.’ सध्या सर्वत्र अनुराग ठाकूर यांच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

 

वहिदा रहमान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलुगू सिनेमांमधून केली होती. अनेक सिनेमांमध्ये वाहिदा रहमान यांनी आयटम नंबर केलं आहे. एक दिवस असा आला जेव्हा गुरुदत्त यांची नजर वाहिदा रहमान यांच्यावर पडली आणि त्यांचं नशीब चमकलं. हिंदी सिनेविश्वात वाहिदा रहमान यांना आणणारे गुरुदत्त होते.

वहिदा रहमान यांनी अभिनेते देवानंद यांच्यासोबत सीआयडी सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केलं. त्यानंतर वाहिदा रहमान यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘गाइड’, ‘नील कमल’, ‘तीसरी कसम’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘राम और श्याम’ यांसारख्या सिनेमे बॉलिवूड दिले आहेत..

वहिदा रहमान यांनी अनेक हिंदी, तामिळ, तेलुगू, आणि बंगाली सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. वहिदा रहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार, २ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांनी वाहिदा रहमान यांना सन्मानित करण्यात आलं आहे.