मुंबई : नुकताच दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळा मोठ्या थाटात पार पडला. पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. कलाकारांसाठी पुरस्कार सोहळ्याचं महत्त्व फार मोठं असतं. आपण केलेल्या कामाची पोचपावती कलाकारांना पुरस्काराच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यासाठी सेलिब्रिटी प्रचंड उत्सुक असतात. दरम्यान, दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमांच्या विभागात अभिनेत्री अमृता खानविलकर हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानवीलकर हिने ‘चंद्रमुखी’ सिनेमातील ‘चंद्रा’ या गाण्याच्या तालावर ठेका धरायला सर्वांना भाग पाडलं.
दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात फक्त बॉलिवूडकरांचा सन्मात करण्यात आला नसून, इतर भाषेतील सिनेमांना देखील पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु आहे..
दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार ‘चंद्रमुखी’ सिनेमाला प्रदाण करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिग्दर्शक प्रसाद ओक याला मिळाला आहे. प्रसाद ओक याच्यासोबतच अभिनेता रितेश देशमुख याला देखील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार वेड सिनेमासाठी देण्यात आला आहे.
एवढंच नाही तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेता आदिनाथ कोठारे याला प्रदाण करण्यात आला आहे. तर अभिनेत्री मानसी नाईक हिला देखील मराठी सिनेमातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळ्याची चर्चा तुफान रंगत आहे.
दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर, टीव्ही विश्वातील कलाकार देखील उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यांमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला, कार्तिक आर्यन यांसारखे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहिले होते.