Bigg Boss 16 Finale : दुसऱ्या लग्नापूर्वी दलजीतने पहिला पती Shalin Bhanot साठी घेतला मोठा निर्णय

| Updated on: Feb 12, 2023 | 10:39 AM

दुसऱ्या लग्नापूर्वी दलजीतने पहिला पती Shalin Bhanot याच्यासोबत असं काय केलं, ज्यामुळे..., एकेकाळी शालीनवर केले होते मारहाणीचे आरोप

Bigg Boss 16 Finale : दुसऱ्या लग्नापूर्वी दलजीतने पहिला पती Shalin Bhanot साठी घेतला मोठा निर्णय
dalljiet kaur
Follow us on

Bigg Boss 16 Finale : काही तासांतच ‘बिग बॉस १६’ ची विजेता घोषित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांसह स्पर्धकांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या बिग बॉसची ट्ऱॉफी कोण घरी घेवून जाणार… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) चा फिनाले आज म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. दरम्यान, प्रत्येक स्पर्धकांचे कुटुंबिय चाहत्यांना वोट करण्यासाठी आवाहन करत आहेत. अशात शालीन भनोट (Shalin Bhanot) यांची पहिली पत्नी दलजीत कौर हिने देखील पहिल्या पतीसाठी मोठं पाऊल उचललं आहे. दलजीत हिने चाहत्यांना शालीन याला वोट करण्यासाठी आवाहन केलं आहे.

दलजीत हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत दलजीत म्हणाली, ‘बिग बॉस १६ चा फिनाले आहे. बिग बॉस सर्वात जास्त कठीण शोपैकी एक आहे. तुम्ही सर्वांनी टॉप ५ पर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत केली. तुम्ही प्रत्येक जण ग्रेट आहेत… तुम्हाला सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट… जो सर्वोत्तम खेळाडू असेल तोच विजयी होईल…’ असं म्हणते दलजीतने सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दलजीत पुढे म्हणाली, ‘मी आज शालीन याच्यासाठी वोट मागत आहे. तुम्ही त्याला वोट कराल अशी आपेक्षा करते. त्याने चांगलं काम केलं आहे. इतके महिने कुटुंबापासून दूर राहणं, एकट्याने आयुष्य जगणं फार कठीण आहे. अशात मी शालीन याला शुभेच्छा देईल. त्याला वोट नक्की करा…’असं देखील दलजीत म्हणाली.

हे सुद्धा वाचा

दलजीत कौर आणि शालीन भनोट यांनी लग्नानंतर ६ वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दलजीत कौर आणि शालीन भनोट यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव जेडन असं आहे. लग्नानंतर काही वर्षात त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. नातं सुधारण्यासाठी दोघांना एकमेकांना अनेक संधी देखील दिल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

अखेर दलजीत आणि शालीन यांनी २०१५ मध्ये घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं दलजीतने सांगितलं. आता दलजीत मार्च महिन्यात दुसरं लग्न करणार आहे. दलजीत कौर हिच्या होणाऱ्या पतीचं नाव निखिल पटेल असं आहे. लग्नानंतर दलजीत कौर लंडनमध्ये राहणार आहे.

दलजीत कौर ही सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. दलजीत कौर हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. दलजीत कौर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता सध्या दलजीत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.