मुंबई : दलजीत कौर हिचे लग्न होऊन आता दोन महिन्यांपेक्षाही अधिक कालावधी झालाय. लग्न झाल्यानंतर दलजीत कौर (Dalljiet Kaur) ही विदेशात शिफ्ट झालीये. निखिल पटेल (Nikhil Patel) याच्याशी दलजीत कौर हिने लग्न केले आहे. दलजीत कौर हिचे निखिल पटेल याच्यासोबत हे दुसरे लग्न आहे. याच्या अगोदर टीव्ही अभिनेता शालिन भनोट (Shalin Bhanot) याच्यासोबत दलजीत कौर हिचे लग्न झाले होते. मात्र, दलजीत कौर आणि शालिन भनोट यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. दलजीत कौर आणि शालिन भनोट यांचा एक मुलगा देखील आहे. दलजीत कौर आणि शालिन यांचा मुलगा सध्या दलजीत हिच्यासोबतच विदेशात आहे.
दलजीत कौर हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत आपण निखिल पटेल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले होते. ज्यावेळी दलजीत कौर हिने निखिल याच्यासोबतच्या नात्याची कबुली दिली, त्यावेळी शालिन भनोट हा बिग बाॅलच्या घरात होता. दलजीत कौर हिने 18 मार्च 2023 रोजी निखिल पटेल याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
फक्त दलजीत कौर हिचेच नाही तर निखिल पटेल याचे देखील हे दुसरे लग्न असून दोन मुली त्याला आहेत. दलजीत कौर ही जरी आता विदेशात असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायमच असते. दलजीत कौर ही ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आयुष्यात नेमके काय सुरू आहे हे सांगताना दिसते.
दलजीत कौर हिने नुकताच सांगितले की, लग्नानंतरचे तिचे आयुष्य कसे सुरू आहे. दलजीत कौर म्हणाली की, माझ्यासाठी प्रत्येक दिवसच हा हनीमूनसारखा आहे, हे संपतच नाहीये…नैरोबी हे एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे. इथे मला भारताची आठवण येते. दलजीत कौर हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. दलजीत कायमच निखिल याच्यासोबत खास फोटो शेअर करताना दिसते.
बिग बाॅसच्या घरात ज्यावेळी शालिन भनोट हा होता, त्यावेळी दलजीत कौर ही त्याला सपोर्ट करताना दिसली होती. इतकेच नाही तर दलजीत कौर हिने शालिन भनोट याच्या सपोर्टमध्ये काही खास पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. दलजीत कौर म्हणाली होती की, शालिन भनोट बिग बाॅसचा विजेता व्हावा असे मला वाटत आहे, कारण तो माझ्या मुलाचा बाप आहे.