मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे, वेब सीरिज आणि डॉक्यूमेंट्री सीरीज प्रदर्शित होत असतात. काही दिवसांपूर्वी ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ डॉक्यूमेंट्री सीरीजचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ डॉक्यूमेंट्री सीरीजची चर्चा सुरु आहे. आता सीरिजचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ डॉक्यूमेंट्री सीरीजची कथा म्हैसूरच्या राजघराण्यातील माजी दिवाण यांची नात शकीरा खलीली हिच्या हत्येवर आधारित आहे.
डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ डॉक्यूमेंट्री सीरीजच्या ट्रेलरमध्ये ९० च्या दशकातील शकिरा खलीली यांची हत्या झाल्याचं दिसत आहे. शकिरा खलीली यांचे पती स्वामी श्रद्धानंद यांनी पत्नीला जिवंत जमिनीत पुरलं होतं. शकिरा खलीली यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या हाय प्रोफाईल प्रकरणात अनेकांनी त्यांचे जबाब नोंदवले होते, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ डॉक्यूमेंट्री सीरीजचा ट्रेलर ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘या #TrueCrimeOnPrime चे सुगावा एकत्र करा ज्यामुळे, आतापर्यंतच्या सर्वात भयानक हत्येचं रहस्य समोर आलं!’ सध्या सीरिजचा ट्रेलर सर्वत्र व्हायरल होत आहे. (dancing on the grave)
piece together the clues of this #TrueCrimeOnPrime that led to one of the most horrifying murder mysteries ever!
Dancing on the Grave, coming Apr 21@Indiatoday @Aajtak @shamstahirkhan @ChandniAD @thestylewallah pic.twitter.com/uS4VnLKuuR— prime video IN (@PrimeVideoIN) April 18, 2023
ट्रेलरच्या शेवटी शकिरा खलीली यांचे पती स्वामी श्रद्धानंद म्हणतात, ‘मला सांगायचं आहे की, माझ्याबद्दल जे काही सांगितलं जात आहे, ते खोटं आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही… ‘ सध्या सर्वत्र ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ सीरिजच्या ट्रेलरची चर्चा रंगत आहे. सीरिजचं दिग्दर्शन आणि लेखण पॅट्रिक ग्राहम यांनी केलं आहे. शकिरा खलीली याच्या हत्येवर आधारित ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ डॉक्यूमेंट्री सीरीज २१ एप्रिल २०२३ रोजी ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण?
मे 1994 मध्ये, कर्नाटक पोलिसांना शकिरा खलीली यांचा मृतदेह घरात जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला. रिपोर्टनुसार शकीरा यांना जेव्हा पुरण्यात आलं, तेव्हा त्या जीवंत होत्या. शकिरा यांना ज्या शवपेटीमध्ये दफन करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांच्या नखांच्या खुणा आढळल्याचं सांगण्यात येत आहे. शकीरा यांना जीवंत दफन केल्यानंतर पती स्वामी श्रद्धानंद यांनी त्याच ठिकाणी पार्टी केली होती. असं देखील सांगण्यात येत आहे.