falguni Pathak यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर; ‘त्या’ रात्री 156 तरुण अडकले जाळ्यात

| Updated on: Oct 17, 2023 | 8:08 AM

falguni Pathak | फाल्गुनी पाठक यांच्या 'गरबा नाइट'चं आयोजन करण्यात आलं होतं, पण 156 तरुण गरब्यासाठी पोहोचलेच नाहीत, कारण जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र घडलेल्या प्रकरणाची चर्चा... 'त्या' रात्री असं झालं तरी काय? पोलिसांचा तपास सुरु

falguni Pathak यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर; त्या रात्री 156 तरुण अडकले जाळ्यात
Follow us on

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : ‘गरबा क्विन’ फाल्गुनी पाठक (falguni Pathak) यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फाल्गुनी पाठक यांची चर्चा रंगली आहे. नवरात्री असल्यामुळे मुंबई येथील बोरीवली याठिकाणी फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’मध्ये सहभागी होण्यासाठी ४ हजार ५०० रुपयांचे पास होते. पण या गोष्टीचा फायदा घेत, फसवणूक करणाऱ्यांनी १५६ तरुणांना स्वतःच्या जाळ्यात अडकवलं आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत, आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय आहे प्रकरण?

कांदिवली याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाला माहिती पडलं की बोरीवली (पश्चिम) येथे फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’चे पास विक्री करणारा अधिकृत विक्रेता आहे. अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करत विशाल शाह कमी दरात पास विक्री करत होता. फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’च्या एका पासची किंमत ४ हजार ५०० रुपये होती. पण विशाल शाह याच्याकडे तरुणाला फक्त ३ हजार ३०० रुपयांमध्ये पास मिळत होते.

पास कमी किंमतीत मिळत असल्यामुळे तरुणाने त्यांच्या अन्य मित्रांना देखील माहिती दिली. असं करत तरुणाने १५६ लोकांना पास खरेदी करण्यासाठी तयार केलं. त्यानंतर सर्वांनी पैसे गोळा केले. विशाल शाह यांनी १५६ तरुणांना एका ठराविक ठिकाणी पोहोचण्यास सांगितले. त्याठिकाणी एक दुसरा व्यक्ती पास घेवून येणार होता. पण तो व्यक्त पास घेवून आलाच नाही.

तरुणांनी बराच वेळ प्रतीक्षा केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून तरुणांने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

नवरात्रीमध्ये फाल्गुनी पाठक यांची गाणी लोकप्रिय

नवरात्रीमध्ये चाहते एक व्यक्ती सतत आठवण काढणार आणि ती व्यक्ती म्हणजे ‘गरबा क्विन’ फाल्गुनी पाठक. ‘मैंने पायल है खनकाये’, ‘चुडी’, ‘मेरी चुनर उड उड जाये’, ‘ये किसने जादू किया’ यांसारख्या गाण्यांमुळे ९० च्या दशकातील दिवस आजही अनेकांना अठवतात.