Zaira Wasim ची पोस्ट पाहून येईल किळस, लोकल बेकरीतील पदार्थाचा फोटो पोस्ट करत म्हणाली…

| Updated on: Aug 12, 2024 | 8:14 AM

Zaira Wasim: लोकल बेकरीतून पदार्थ खरेदी करताय सावधान..., झायरा वसीन हिने पोस्ट केलेल्या पदार्थाचा फोटो पाहून येईल किळस..., फोटो पोस्ट म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झायरा वसीम हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

Zaira Wasim ची पोस्ट पाहून येईल किळस, लोकल बेकरीतील पदार्थाचा फोटो पोस्ट करत म्हणाली...
Follow us on

बॉलिवूडची माजी अभिनेत्री झायरा वसीम हिने ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण झायरा आता बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. झायरा हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत झायरा हिने लोकल बेकरीतून पदार्थ खरेदी करता काळजी घ्या… असं अवाहन चाहत्यांना केलं आहे. सध्या सर्वत्र झायरा वसीम हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेला फोटो पाहून तुम्हाला देखील किळस येईल…

नुकताच, दंगल गर्ल झायरा वसीम जम्मू – कश्मीर येथील एका कॅफेमध्ये गेली होती. जेथे तिने खाण्यासाठी काही पदार्थ ऑर्डर केले. पण झायरा हिला ऑर्डर केलेल्या पदार्थामध्ये असं काही दिसलं ज्यामुळे अभिनेत्रीला बाहेरचं खाण्यास भीती वाटू लागली… पदार्थाचा फोटो देखील झायरा हिने पोस्ट केला आहे.

झायरा वसीमने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. श्रीनगर येथील लोकल कॅफेमधून खरेदी केलेल्या पदार्थाला बुरशी लागली होती. झायरा फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘लोकल बेकरीमधून पदार्थ घेताना विचार करा. मला पदार्थाला बुरशी लागल्याचं आढळलं आहे. असं काही खाण्याआधी दोनवेळा नक्की तपासून पाहा की पदार्थ कसा आहे…’ सध्या अभिनेत्रीचा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

झायरा हिने सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना जागृक केल्यामुळे अभिनेत्रीचं कौतुक होत आहे. याआधी देखील बाहेरच्या पादार्थांमध्ये कचरा, किडे, पाखरं असल्याची चित्र समोर आलं आहे. त्यामुळे बाहेरचं खाण्याआधी किंवा कोणते पदार्थ खरेदी करण्यापूर्वी एकदा खात्री करु घ्या..

झायरा वसीम हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘दंगल’ सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली होती. ज्यासाठी झायरा हिने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं. ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमातून देखील झायराने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबत देखील झायरा हिने स्क्रिन शेअर केली आहे. ‘स्काय इज पिंक’ सिनेमात झायराने महत्त्वाची भूमिका साकारली. पण त्यानंतर झायराने अभिनय विश्वातून सन्यांस घेतला. धर्माचं कारण सांगत अभिनेत्री बॉलिवूडला निरोप दिला.

झायरा आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर झायराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी झायरा रोजच्या दिवसांचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते.