चेहऱ्यावर लाल डाग, गंभीर आजार, वयाच्या 19 व्या अभिनेत्रीचं निधन, आईकडून मोठा खुलासा

| Updated on: Feb 18, 2024 | 8:06 AM

Suhani Bhatnagar Death : अपूर्ण राहिलं 'दंगल' फेम सुहानी भटनागर हिचं स्वप्न, वयाच्या 19 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्रीने गमावले प्राण, आईकडून तिच्या आजाराबद्दल मोठा खुलासा, 'चेहऱ्यावर असलेल्या लाल डागांमुळे...'

चेहऱ्यावर लाल डाग, गंभीर आजार, वयाच्या 19 व्या अभिनेत्रीचं निधन, आईकडून मोठा खुलासा
Follow us on

Suhani Bhatnagar Death : ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. शनिवारी सकाळी सुहानी भटनागर हिचं निधन झालं. रिपोर्टनुसार, दोन महिन्यांपूर्वी सुहानी गंभीर आजाराच्या जाळ्यात अडकली होती. अचानक तिच्या शरीरावर लाल रंगाचे डाग दिसू लागले आणि सुहानी डर्मेटोमायोसिटिस या गंभीर आजाराची शिकार झाली. शरीराच्या अवयवांमध्ये पाणी भरल्याने आणि फुफ्फुस खराब झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सुहानी हिच्या आई – वडिलांनी लेकीच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे.

सुहानी भटनागर हिची आई पूजा भटनागर म्हणाल्या, ‘सुहानी हिला मॉडेलिंग आणि अभिनयाची फार आवड होती. दिल्लीत एका मुलाखतीत तिला बोलावण्यात आलं होतं. 1000 मुलींमधून सुहानी हिची निवड झाली होती. ज्यानंतर ‘दंगल’ सिनेमात तिला बबीता फोगट ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. फक्त अभिनयात नाही तर, पत्रकारितेत देखील सुहानीला शिक्षण पूर्ण करायचं होतं.’

‘सुहानी तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार होती. पण तिचे सर्व स्वप्न अपूर्ण राहिले. तिच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.’ असं सुहानी भटनागर हिच्या आईने सांगितलं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या वडिलांनी लेकीच्या आजाराबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे.

हे सुद्धा वाचा

सुहानी भटनागर हिचे वडील पुनीत भटनागर म्हणाले, ‘दोन महिन्यांपूर्वी तिच्या हातावर, चेहऱ्यावर लाल डाग आले होते. आम्हाला वाटलं कसली एलर्जी झाली असेल. त्यानंतर तिच्या मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु केले. पण डॉक्टरांना तिचा आजार कळलाच नाही. सुहानी हिची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर तिला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तेथे देखील तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. सुहानी हिच्या संपूर्ण शरीरात हळू हळू पाणी भरु लागलं. ज्यामुळे तिचे फुफ्फुस खराब झाले आणि तिने जगाचा निरोप घेतला…’ सुहानी हिच्या निधनामुळे कुटुंबियांसोबत चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

सुहानी भटनागर हिच्या निधनावर अभिनेता आमिर खान याने व्यक्त केलं दुःख

अभिनेता आमिर खान याच्या प्रॉडक्शन हाऊसेने एक्सवर एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं. ‘सुहानी हिच्या निधनाची बातमी कळल्यानंतर मोठा धक्का बसला. आमची सहानुभूती तिची आई पूजा आणि संपूर्ण कुटुंबासोबत आहे. सुहानी प्रचंड हुशार आणि टॅलेंटेड मुलगी होती. सुहानी शिवाय ‘दंगल’ कधीच पूर्ण झाली नसती. सुहानी तू कायम चमकणाऱ्या तऱ्यांप्रमाणे आमच्या मनात चमकत राहशील. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो…’ सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी सुहानी हिला श्रद्धांजली वाहिली.