Dawood Ibrahim’s Son: अंडरवर्ल्ड हे नाव ऐकल्यानंतर समोर बॉलिवूड सिनेमांमधील अनेक सीन आणि डायलॉग समोर येतात. गुन्हेगारी विश्वात सक्रिय असलेल्या लोकांचं विश्व म्हणजे अंडरवर्ल्ड… एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि मुंबईवर अंडरवर्ल्डचं वर्चस्व होतं. माफिया डॉन रस्त्यावर खुलेआम फिरत होते. ते बॉलीवूड स्टार्सना भेटायचे… अशाच एका डॉनपैकी एक म्हणजे दाऊद इब्राहिम… आजही दाऊद इब्राहिम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
दाऊद इब्राहिम याच्याबद्दल सांगायचं झालं तर, मुंबईतील एका हवालदाराचा मुलगा गुन्हेगारी विश्वाचा किंग झाला. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम भारतातून पळून गेला होता. सध्या तो पाकिस्तानमध्ये राहत असून दाऊद इब्राहिम आता वृद्ध झाला आहे. सांगायचं झालं तर, दाऊदची असलेली दहशत देखील आता संपत असल्याचं चित्र आहे. अशात असा प्रश्न देखील निर्माण होतो तो म्हणजे, दाऊदचं क्राईम नेटवर्क आता त्याचा मुलगा सांभाळत आहे? दाऊद याच्या मुलाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
68 वर्षीय दाऊद इब्राहिमने एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डवर वर्चस्व गाजवलं होतं. पोलिसांपासून ते मंत्र्यांपर्यंत बॉलीवूड कलाकारांपासून क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांशी दाऊद इब्राहिमचे संपर्क होते. मात्र मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचल्यानंतर दाऊद इब्राहिमला देश सोडून पळून जावं लागलं होतं. आता दाऊद कराची याठिकाणी आहे.
दाऊद इब्राहिम याचं संपूर्ण कुटुंब कराची याठिकाणी राहतं… दाऊद इब्राहिम याला एक मुलगा देखील आहे. त्याच्या मुलाचं नाव मोईन इब्राहिम असं आहे. मोईन इब्राहिम याला मोईन कासकर म्हणून देखील ओळखलं जातं. अशात दाऊद इब्राहिमचा मुलगा मोईन इब्राहिमही त्याच्या वडिलांप्रमाणे अंडरवर्ल्डचा व्यवसाय सांभाळतो का? तोही अंडरवर्ल्ड डॉन आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार. मोईन इब्राहिमला वडील दाऊदच्या व्यवसायात रस नाही. इक्बाल कासकर याला पकडल्यानंतर त्याने पोलिसांना मोठी माहिती दिली.
इक्बाल कासकर याने दिलेल्या माहितीनुसार, दाऊदच्या व्यवसायात मोईन इब्राहिम याला रस नाही. त्याचा कल धर्माकडे आहे. मोईन इब्राहिम त्याचा अधिक काळ मशिदीत व्यतीत करतो. एवढंच नाही तर, दाऊद इब्राहिमचा मुलगा मोईन इब्राहिम मौलाना झाल्याची माहिती देखील 2017 मध्ये समोर आली. पण यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.