TMKOC| ठरलं.. ‘या’ दिवशी दयाबेन मालिकेत परतणार; गोकुळधाम रहिवाश्यांचा आनंद द्विगुणित

| Updated on: Jul 18, 2023 | 10:12 AM

ज्या क्षणाची सर्वांना प्रतीक्षा होती, अखेर 'तो' क्षण आला आहे... गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेत दिसत नसलेली दयाबेन 'या' दिवशी प्रेक्षकांच्या येणार भेटीस... सर्वत्र मालिकेची चर्चा...

TMKOC| ठरलं.. या दिवशी दयाबेन मालिकेत परतणार; गोकुळधाम रहिवाश्यांचा आनंद द्विगुणित
Follow us on

मुंबई | 18 जुलै 2023 : कायम आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांना पोट धरुन हासवणारी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या सहा वर्षांपूर्वी मालिकेतील दयाबेन हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण आता दयाबेन पुन्हा मालिकेत पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची चर्चा रंगत आहे. दयाबेन मालिकेत परतणार असल्याची चर्चा रंगताच ती कधी परतणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर दयाबेन हिने नाही तर, तिच्या भावाने सांगितलं आहे. दयाबेन गोकुळधाममध्ये परतणार असल्यामुळे फक्त जेठालाल याचाच नाही तर, गोकुळधामच्या सर्वच रहिवाश्यांचा उत्साह वाढला आहे.

सध्या मालिकेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जेठालाल सुंदरलाल याला दया पुन्हा घरी कधी येणार असं विचारताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे जेठालाल याने ठरलवंच आहे की, सुंदरलाल याला विचारयचं दया अहमदाबादाहून पुन्हा गोकुळधाममध्ये कधी परतणार..

अखेर सुंदरलाल जेठालाल आणि गोकुळधामच्या रहिवाश्यांना सांगतो की, कधी दया घरी पुन्हा परतणार.. सुंदरलाल म्हणतो, ‘यंदाच्या दिवाळीत दिवे माझी बहीणच लावेल..’ म्हणजे यंदाच्या दिवळीपासून दयाबेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दिसणार आहे. पुढे सुंदरलाल म्हणतो, ‘मी दिवाळी सांगत आहे, पण माझी बहीण त्याआधी देखील गोकूळधाममध्ये येवू शकते..’

सुंदरलाल याने दयाबेन हिच्याबद्दल दिलेल्या माहितीनंतर पूर्ण गोकुळधाम रहिवाश्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आता गोकुळधाम रहिवाश्यांप्रमाणे प्रेक्षक देखील त्या क्षणात्या प्रतीक्षेत आहेत, जेव्हा दयाबेन पुन्हा मालिकेत परतेल आणि चाहत्यांचं मनोरंजन करेल.. सध्या सर्वत्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची चर्चा रंगत आहे.

दयाबेन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, २०१७ मध्ये दिशा वकानी हिने मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर दिशा वकानी मालिकेतच परतलीच नाही. आता दयाबेन मालिकेत परतणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून मालिका सतत वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. जवळपास १५ वर्षांच्या मालिकेच्या प्रवासात अनेक चढ – उतार आले. अनेक कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. तर अनेकांनी निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले.

पण आता मालिकेत दयाबेन येणार असल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेला चाहते प्रेम देतात.