मुंबईः भारतीय चित्रपटसृष्टीला (Indian Cinema) आरंभीचे दिवस खूप कठीण होते. चित्रपटासाठी लागणारी सर्व साहित्यसाम्रगी नसतानाही चित्रपट निर्मिती करणे त्याकाळात एक मोठे आव्हान होते. मात्र त्याकाळातील कलाकारांनी हे आव्हान स्वीकारुन त्यांनी चित्रपट निर्मिती केली. हा काळ होता 20 व्या शतकातील, ज्या काळात भारतीय सिनेमा उभा राहू बघत होता. भारतीय सिनेमाच्या उभारणीच्या काळात काही दिलदार आणि मोठ्या मनाची माणसं सिनेमासाठी प्रयत्नशील होते. चित्रपट उभारणीच्या काळातील एक महत्वाचे नाव म्हणजे के. एन. सिंग. (k.n.singh) त्यांचे पूर्ण नाव कृषन निरंजन सिंग. (Krishan Niranjan Singh) त्यांनी त्यांच्या आयुष्यातील दोन दशकं भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वाहून घेतली, आणि भारतीय सिनेमा पुढे कसा जाईल यासाठी सतत प्रयत्नशील करत राहिले. तो असा काळ होता की कलाकारांची कमतरता होती, चित्रपटासाठी लागणारी साम्रगी नव्हती तरीही चित्रपटक्षेत्राशी काही माणसं अशी जोडली गेली होती की, ज्यांना पैशाची भूरळ पडली होती. त्या काळाचा इतिहास पाहताना के. एन. सिंग यांच्या चित्रपट योगदानालाही आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
भारतीय सिनेमाच्या आरंभीच्या काळातील के. एन. सिंग एक चारित्र्यवान कलाकार म्हणून ओळखले जात. 1 सप्टेंबर 1908 मध्ये जन्मलेल्या के. एन. सिंग यांनी त्याकाळातील चित्रपटातून खलनायकाच्य भूमिका साकारल्या. 1936 पासून ते 1980 पर्यंत त्यांनी सातत्याने चित्रपटात काम केले. सिंग यांचा पिंड खरं तर खेळाडूचा होता, पण ते चित्रपटसृष्टीकडे वळले आणि 200 च्या वर चित्रपटातून त्यांनी भूमिका केली. मुळात खेळाडू असलेल्या सिंग यांना 1936 मध्ये बर्लिनमध्ये झालेल्या ऑलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली होती, मात्र ते गेले नाहीत.
के. एन. सिंग एकदा कोलकात्याला गेले असताना त्यांची ओळख पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर झाली. पृथ्वीराज यांनी त्यांना देवकी बोस यांच्याबरोबर भेट घालून दिली. त्यानंतर बोस यांनी त्यांना सुनहारा संसार चित्रपटात डबल रोलचा एक रोल दिला. त्यानंतर 1938 मध्ये आलेल्या बागवान चित्रपट हिट ठरला आणि ते अभिनेते म्हणून नावारुपाला आले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटातून वेगवेळ्या भूमिका त्यांनी साकाराल्या
बागवान चित्रपटाच्या यशानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीला सुरुवात झाली. त्याकाळात त्यांना समोर ठेऊन अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या भूमिका लिहिल्या आहेत. 1940 ते 1950 मध्ये त्यांनी आयकॉनिक अशा चित्रपटांची निर्मिती केली. त्यामध्ये सिंकदर (1941), ज्वारा भाटा (1944), हुमायू (1945), आवारा (1951), जाल(1952), सीआयडी(1956), हावडा ब्रिज (1958), चलती का नाम गाडी (1958), और आम्रपाली(1966) हे त्यांचे बॉक्सऑफिसवर हिट ठरलेले चित्रपट. त्यांनी अनेक चित्रपटातून खलनायकच साकारला आहे.
संबंधित बातम्या