रुग्णालयात कोणी शूट केला डेबिनाच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ? अभिनेत्रीने सांगितलं सिक्रेट

| Updated on: Dec 14, 2022 | 9:55 AM

ऑपरेशन थिएटरमधील डिलिव्हरीच्या व्हिडीओबद्दल अखेर डेबिनाने केला खुलासा

रुग्णालयात कोणी शूट केला डेबिनाच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ? अभिनेत्रीने सांगितलं सिक्रेट
Debina Bonnerjee
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री डेबिना बॅनर्जी सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. डेबिनाच नुकताच दुसऱ्या मुलीला जन्म दिला. डिलिव्हरीनंतर ती अनेकदा सोशल मीडियावर फिटनेसबाबत व्यक्त झाली. आता डेबिनाने आणखी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने सांगितलं की रुग्णालयातील तिच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ कोणी शूट केला होता?

डेबिनाच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ कोणी बनवला?

डेबिनाने तिच्या युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कारने कुठेतरी प्रवास करताना दिसतेय. डेबिनासोबत गुरमीत चौधरी आणि त्यांचा मित्र रोमांचसुद्धा आहे. रुग्णालयात डिलिव्हरीचा व्हिडीओ शूट करण्यासाठी मॅनेजमेंटची परवागनी घेतल्याचं तिने स्पष्ट केलं. मॅनेजमेंटकडून विशेष परवानगी मिळाल्यानंतर तिच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ शूट करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

डेबिनाने पुढे सांगितलं की डिलिव्हरीचा व्हिडीओ रोमांचने शूट केला होता. रोमांचसुद्धा गुरमीतसोबत हॉस्पीटल ड्रेसमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये गेला होता. रोमांच म्हणतो की त्याने जेव्हा डेबिनाचं ऑफरेशन होताना पाहिलं, तेव्हा त्याच्याकडे बोलायला शब्दच नव्हते. ‘ऑपरेशन पाहिल्यानंतर मी सर्व आईंना सलाम करतो’, असं रोमांच म्हणाला.

“मला आधी वाटायचं की मी खूप स्ट्राँग आहे. रस्त्यावर एखादा अपघात झाला तर सर्वांत आधी मी मदत करायला धावायचो. मात्र डेबिनाच्या शरीरावर रक्त पाहिलं तेव्हा माझी शुद्धच हरपली. सुरुवातीला मी सी-सेक्शन डिलिव्हरी पाहण्यासाठी खूप उत्सुक होतो. पण ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर माझी हिंमतच झाली नाही”, असं गुरमीत म्हणाला.

“डिलिव्हरीनंतर मी जेव्हा गुरमीत आणि रोमांचचा चेहरा पाहिला, तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते”, असं डेबिना म्हणाली. गुरमीत आणि डेबिनाने हेसुद्धा सांगितलं की त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव ठरवलं आहे. मात्र हे नाव इतक्यात जाहीर करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.