अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या 6 वर्षांनंतर रणवीर – दीपिका यांच्या आयुष्यात चिमुकल्या बाळाचं आगमन होणार आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिका पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. याबद्दल खुद्द दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. पण सोशल मीडियावर सध्या दीपिका-रणवीर यांचा लहान बाळाचा फोटो व्हायरल होत आहे. समोर आलेला फोटो रुग्णालयातील आहे. त्यामुळे सर्वत्र दोघांची चर्चा रंगली आहे. तर फोटो मागचं सत्य नक्की काय आहे जाणून घेऊ…
दीपिका – रणवीर यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोत दिसणाऱ्या दीपिकाने गोंडस मुलाला जन्म दिल्याचं समजत आहे. तर रणवीर याच्या कडेवर बाळ दिसत आहे. सध्या फोटो सर्वत्र चर्चेत आहे. पण व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये काहीही तथ्य नाही. फोटो फेक असून, त्याला मॉर्फ्ड करण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार, सप्टेंबर महिन्यात दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सांगायचं झालं तर, प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर अनेक ठिकाणी दीपिका हिला स्पॉट करण्यात आलं. शिवाय बेबी बम्प फॉन्ट करत अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो देखील पोस्ट केले. एवढंच नाही तर, ‘कल्कि 2898 AD’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये देखील अभिनेत्रीला स्पॉट करण्यात आलं, तेव्हा महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता प्रभास, दीपिका हिची काळजी घेताना दिसला…
दीपिका हिला प्रेग्नेंसी दरम्यान देखील ‘सिंघम अगेन’ सिनेमाची शुटिंग करताना स्पॉट करण्यात आलं. दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमात दीपिका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात दिसेल. सोशल मीडियावर दीपिकाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. सध्या सर्वत्र दीपिका आणि रणवीर यांची चर्चा रंगली आहे.
काही महिन्यांपूर्वी दीपिकाने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर दीपिका – रणवीर यांनी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. दीपिका – रणवीर यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर महिन्याच्या शेवटी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.