दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी केली एकमेकांची पोलखोल, मोठा खुलासा

| Updated on: Oct 22, 2023 | 10:54 PM

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघे कायमच चर्चेत असतात. रणवीर सिंह याचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झाला. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या जोडीने मोठा धमाका हा नक्कीच केला.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी केली एकमेकांची पोलखोल, मोठा खुलासा
Follow us on

मुंबई : कॉफी विथ करण (Koffee With Karan) शोचे 8 वे सीजन चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सीजला लवकरच सुरूवात होणार आहे. करण जोहर या सीजनमुळे जोरदार चर्चेत आहे. कॉफी विथ करण शोमध्ये मोठे खुलासे होणार असल्याचे देखील स्पष्ट आहे. या शोच्या माध्यमातून करण जोहर हा बाॅलिवूड (Bollywood) कलाकारांना त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल अनेकदा प्रश्न विचारताना दिसतो. कॉफी विथ करणमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी व्हायरल झाली.

कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये कंगना राणावत ही सहभागी होणार नसल्याने तिच्या चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण हे बघायला मिळाले. अनेकांनी यावरूनच करण जोहर याला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर कॉफी विथ करणमध्ये स्टार किड्सला बोलत असल्याने करण जोहर याच्यावर सतत टीका केली जातंय.

सध्या कॉफी विथ करण सीजन 8 चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे दिसत आहेत. इतकेच नाही तर यावेळी हे दोघेही धमाल आणि मस्ती करण जोहर याच्यासोबत करताना दिसत आहेत. करण जोहर हा त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारताना दिसतोय.

कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण मोठे खुलासे करताना दिसत आहेत. रणवीर सिंह याला करण जोहर हा विचारतो की, तू दीपिका पादुकोण हिला पहिल्यांदा कधी प्रपोज केला. यावर रणवीर सिंह म्हणतो की, मी 2015 मध्ये सर्वात अगोदर दीपिका पादुकोण हिला प्रपोज केला.

इतकेच नाही तर कॉफी विथ करण शोमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघेही एकमेकांची पोलखोल करताना दिसत आहेत. कॉफी विथ करणचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. यावरून हा अंदाजा लावला जाऊ शकतो की, या सीजनमध्ये किती जास्त धमाका होणार सुहाना खान देखील या सीजमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय.