दीपिका पादुकोणने बेबी बम्प फ्लॉन्ट करताच रणवीर म्हणाला, ‘माझ्यासाठी सर्वात खास…’

| Updated on: Jul 06, 2024 | 12:28 PM

प्रत्येक नवऱ्या रणवीरकडून प्रेम शिकायला हवं..., दीपिका पादुकोणने बेबी बम्प फ्लॉन्ट करताच पती रणवीर सिंग याची लक्षवेधी प्रतिक्रिया; अभिनेता म्हणाला, 'माझ्यासाठी सर्वात खास...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका - रणवीर यांच्या नात्याची चर्चा...

दीपिका पादुकोणने बेबी बम्प फ्लॉन्ट करताच रणवीर म्हणाला, माझ्यासाठी सर्वात खास...
Follow us on

अभिनेता रणवीर कपूर याचा आज (शनिवार) वाढदिवस आहे. अभिनेत्यांचा वाढदिवस असल्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण पत्नी दीपिका हिने मात्र खास अंदाजात पती रणवीर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका हिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये दीपिका हिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

निळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्री बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘फाक्त याच कारणामुळे आज फ्रायडे नाईट आहे आणि पार्टी करायची आहे…’ असं म्हणत दीपिका हिने पती रणवीर याला टॅग केलं आहे. यावर रणवीर याने केलेली कमेंट चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. अभिनेता म्हणाला, ‘माझ्यासाठी सर्वात खास भेट… आय लव्ह यू…’

दीपिकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘रणवीर सिंग किती क्यूट आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा… मोस्ट केयरिंग होणारा बाबा…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रत्येक नवऱ्याने रणवीरकडून प्रेम शिकायला हवं…’ तर अनेकांनी अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

सांगायचं झालं तर, शुक्रवारी दीपिका आणि रणवीर यांना अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात स्पॉट करण्यात आलं होतं. संगीत सोहळ्यात जाण्यापूर्वी दीपिका हिने फोटो पोस्ट केले होते. दीपिका आणि रणवीर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचं आगमन

काही महिन्यांपूर्वी दीपिकाने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर दीपिका – रणवीर यांनी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. दीपिका – रणवीर यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर महिन्याच्या शेवटी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांचे आगामी सिनेमे

दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, दोघे देखील दिग्दर्शक रोहीत शेट्टी याच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमाचे काही पोस्टर देखील दीपिका – रणवीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सिनेमात दोघांसोबत अजय देवगन, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर, टायगर श्रॉफ यांच्यासोबत अन्स सेलिब्रिटी देखील झळकणार आहेत.