उद्योगपती विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सिद्धार्थ मल्ल्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या लग्नाची माहिती दिली आहे. सिद्धार्थ मल्ल्याने गेल्या वर्षीच त्याची गर्लफ्रेंड जस्मिनसोबत एंगेजमेंट केली होती. आता तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लग्नाचा आठवडा सुरू झाला आहे…’. सिद्धार्थ मल्ल्या आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या नात्याची देखील बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा होती. दोघे ही एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत होते. पण दोघांमध्ये नंतर ब्रेकअप झाला.
रणवीर सिंहसोबत लग्न करण्याआधी दीपिका पदुकोण ही सिद्धार्थ मल्ल्याला डेट करत होती. दोघांना अनेकवेळा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले होते. एकदा दीपिका आयपीएल सामन्यादरम्यान सिद्धार्थ मल्ल्याला किस करताना देखील दिसली होती. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशीची पुष्टी झाली होती की ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
सिद्धार्थ मल्ल्या आणि दीपिका पदुकोण अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. दोघांनी अनेकदा एकमेकांना महागड्या भेटवस्तू दिल्या. दोघांचेही लग्न होईल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही. काही काळानंतर दोघांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
दीपिका पदुकोणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थ मल्ल्याने अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना दीपिका म्हणाली होती की, “मी नातं निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला, पण अलीकडच्या काळात त्याचं वागणं खराब झालं आहे. मागच्या वेळी जेव्हा आम्ही एका डिनर डेटला भेटलो तेव्हा त्याने मला बिल देण्यास सांगितलं. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे होते.”
सिद्धार्थने दीपिकावर आरोप केला होता की, त्याे तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या. दीपिकाने आपल्याला महागडे हिरे परत केले नसल्याचा आरोप सिद्धार्थने केल्यावर प्रकरण आणखी वाढले. दीपिका पदुकोणने 2018 मध्ये रणवीर सिंहसोबत लग्न केले आणि आता ती लवकरच आई होणार आहे.