दीपिका पदुकोण बॉलिवूडला करणार बाय-बाय? काय आहे कारण

| Updated on: Jul 03, 2024 | 8:04 PM

Deepika Padukone : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत. अभिनेत्री सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रकारामुळे चाहते चिंतेत आहेत. दीपिका पदुकोण बॉलिवूडला बायबाय करणार आहे असा दावा केला जात आहे.

दीपिका पदुकोण बॉलिवूडला करणार बाय-बाय? काय आहे कारण
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. दीपिका पदुकोण सध्या गरोदर आहे. पण तरी देखील ती सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कुठेही मागे नव्हती. दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी च्या प्रमोशनमध्ये बेबी बंप घेऊन प्रचार करत आहे. तर प्रभास आणि अमिताभ बच्चन तिची खूप काळजी घेताना दिसत आहेत. दीपिकाच्या फॅन पेजवर अनेक लोकं म्हणत आहेत की, हा तिचा शेवटचा चित्रपट असावा. पण लोकांना असं का वाटतंय? यामागचे कारण म्हणजे दीपिका पदुकोणने एकेकाळी केलेले विधान आहे.

दीपिका पदुकोण सप्टेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. त्याआधी दीपिका पदुकोणने ‘माय चॉइस’च्या एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की, सुखी वैवाहिक जीवनासाठी ती अभिनय देखील सोडू शकते. तिने हे विधान तेव्हा केले होते जेव्हा दीपिका पदुकोण बॉलिवूड स्टार रणवीर सिंगला डेट करत होती. पुढे आता दोघांनी लग्न केले आहे आणि लवकरच ते एका बाळाचे पालक होणार आहेत. इतकेच नाही तर दीपिका पदुकोणने डीएनए मुलाखतीत सांगितले होते की, तिला मुलं खूप आवडतात आणि तिला खूप मुलं हवी आहेत. दीपिकाने सांगितले होते की, ती शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि होमी अदजानियाच्या मुलांसोबत खूप वेळ घालवते.

प्रसूतीनंतर दीपिका अभिनय सोडणार का?

दीपिका पदुकोणसाठी ही वेळ खूप खास आहे. कारण ती पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. पण असं असलं तरी जन्मानंतर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला चित्रपटात पाहायला मिळणार नाही? या प्रश्नाचे उत्तर स्वतः दीपिकाच देऊ शकते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही तिच्या पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर चित्रपटांमधील भूमिका खूपच कमी केल्या होत्या, तरीही तिने कॅमेऱ्याच्या मागे काम करणे सुरूच ठेवले होते.

दीपिका ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत दिसणार

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पदुकोण ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोण देखील रोहित शेट्टीच्या या सिनेमाचा भाग आहे. नुकतेच रोहित शेट्टीने दीपिका पदुकोणला लेडी सिंघमच्या भूमिकेत आणणार असल्याचे जाहीर केले होते. याआधी रणवीर सिंग, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​रोहित शेट्टीच्या पोलीस विश्वाचा एक भाग बनले आहेत.