मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्री वेडिंग फंक्शनमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हेच नाही तर विदेशातूनही पाहुण्यांचे आगमन या प्री वेडिंग फंक्शनसाठी झाले. या प्री वेडिंग फंक्शनकडे अख्या जगाचे लक्ष लागल्याचे देखील बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार तयारी ही सुरू आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हे प्री वेडिंग फंक्शन पार पडतंय. या फॅक्शनचा तसा आज शेवटचा दिवस आहे.
अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री वेडिंग फंक्शनला अख्ये बाॅलिवूड पोहचले. बाॅलिवूडच्या कलाकारांची सतत या फंक्शनमधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकारांना या प्री वेडिंग फंक्शनचे आमंत्रण आहे. फक्त कलाकारच नाही तर त्यांचे घरातील सदस्य हे देखील जामनगरमध्ये दाखल झाले आहेत.
सध्या या प्री वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मात्र, या व्हिडीओनंतर लोक हे दीपिका पादुकोण हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्याकडून मोठी घोषणा ही करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोण ही बाळाला जन्म देणार आहे.
प्री वेडिंग फंक्शनमधील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण ही पती रणवीर सिंह याच्यासोबत नगाडा संग ढोल’ आणि ‘गल्ला गूडिया’ या गाण्यांवर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. दोघेही जबरदस्त असा डान्स नक्कीच करत आहेत. मात्र, दीपिकाने प्रेग्नंसीमध्ये अशाप्रकारचा डान्स करणे हे तिच्या चाहत्यांना अजिबातच आवडले नाहीये.
यावरूनच दीपिका पादुकोण ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळतंय. अजून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण ही रणवीर सिंह याच्यासोबत दांडिया खेळताना दिसत आहे. या पार्टीमध्ये बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी जबरदस्त डान्स केले आहेत. तीन दिवसांपासून हे प्री वेडिंग फंक्शन सुरू आहे. पाहुण्यांसाठी राहण्याची खास व्यवस्था देखील करण्यात आलीये.