प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘मास्टर शेफ’ चा जज असलेला लोकप्रिय सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर याला दिल्ली उच्च न्यायालयाने पत्नीला घटस्फोट देण्याची परवानगी दिली आहे. मंगळवारी त्याच्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने हा निर्णय दिला. कुणालने पत्नीने केलेल्या क्रूरतेचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अखेर कुणाल कपूर याचा घटस्फोट झाला आहे.
कुणाल कपूर याने दाखल केलेल्या यचिकेत पत्नीवर गंभीर आरोप केलेत. आई – वडिलांसोबत पत्नीकडून होणारं गैरवर्तन आणि अपमान केल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टनुसार, कुणाल याच्या पत्नीने सर्वांसमोर पतीचा अपमान केला होता. ज्याला कोर्टाने क्रूरता असल्याचं सांगितलं आहे.
न्यायालयाने सांगितल्यानुसार, कुणालच्या पत्नीचं आचरण योग्य नव्हतं. पतीचा आदर करणं, पतीच्या प्रतिष्ठेला ठेच लागू न देणं… याची कुणालाच्या पत्नीला जाणीव नव्हती. पती प्रति कोणातही सहानुभूती देखील नसल्यामुळे कोर्टाने घटस्फोट मंजूर केल्याची माहिती मिळत आहे.
कोर्टाने सांगितल्यानुसार, दोघांमध्ये एकची जरी वागणूक योग्य नसल्यास त्याचा परिणाम नात्यावर होतो. त्यामुळे दोघांना देखील एकत्र राहण्यासाठी मजबूर केलं जाऊ शकत नाही… सांगायचं झालं तर, दिल्ली कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यापूर्वी कुणाल कपूर याने फॅमिली कोर्टाता अर्ज दाखल केला होता.
फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर कुणाल याची याचिका फेटाळण्यात आली. पण अखेर कुणाल कपूर याच्या घटस्फोचाला दिल्ली कोर्टाने मंजुरी दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कुणाल कपूर याच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.
कुणाल कपूर यांचं लग्न 2008 मध्ये झाले होतं. कुणाल याला एक मुलगा देखील आहे. मुलगा झाल्यानंतर देखील पती-पत्नीमधील वाद संपले नाही. अखेर नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं. मतभेद मिटवण्याचे प्रयत्न करूनही, पत्नीसोबतचे वैवाहिक संबंध सतत बिघडत गेले.
कुणाल कपूरने त्याच्या पत्नीवर कुटुंब आणि त्याच्याशी सतत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला. त्यानंतर पत्नीने हे आरोप खोटे ठरवले आणि घटस्फोट घेण्यासाठी कथा रचल्याचा आरोप केला. याआधी देखील झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटींचे घटस्फोट झाले आहेत.