सोशल मीडियावर दररोज काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलिकडेच राजधानी दिल्लीच्या नरैना पोलीस स्टेशनमध्ये एसएचओ श्री निवास यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एसएचओ साहेब आपल्या पत्नीसोबत दिल्ली पोलिसांचा गणवेश घालून डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एसएचओ श्री निवास यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या साहेबांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्स प्रतिक्रिया देत आहेत.
एसएचओ श्री निवास आपल्या मुलीच्या साखरपुड्यात कुटुंबासमवेत उत्सव साजरा करत होते. पत्नी आणि मुलीच्या सांगण्यावरून ते युनिफॉर्म घालून डान्स फ्लोअरवर आले आणि बायकोसोबत हरियाणवी गाण्यावर नाचू लागले.
या दरम्यान दिल्ली पोलिसांचा आणखी एक जवानही या व्हिडिओत दिसत आहे. कुटुंबातील इतर सदस्यही तिथे उपस्थित होते, असं व्हिडिओत दिसतंय.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडत आहे. संमिश्र प्रतिक्रिया आहेत, काही जण म्हणतायत अशा प्रकारे युनिफॉर्म घालून डान्स करणे चुकीचे आहे तर काही लोक म्हणतायत पोलिसांना पण अशाप्रकारे मजा करायचा अधिकार आहे.
डांस करते थानेदार @DelhiPolice में नारायणा थाने के SHO श्रीनिवास हैं। य़ह किसी और की शादी मे नहीं बल्कि अपनी बेटी की सगाई मे अपनी पत्नी के साथ डांस कर रहे हैं। वह भी अपनी पत्नी और बेटी के कहने पर। सोशल मीडिया पर इसे ऐसे बता रहे हैं जैसे उन्होंने कोई गुनाह कर दिया हो। pic.twitter.com/DqLhwtL858
— Maneesh Aggarwal (@ManeeshLLB) December 20, 2022
एका यूजरने लिहिले, ‘अशा पोलिस कर्मचाऱ्यांना त्रास दिला तर पोलिस कर्मचारी त्यांच्या कुटुंबापासून वेगळे होऊन नैराश्यात जातील. आपल्या कौटुंबिक समारंभात नृत्य करणे किंवा आपला आनंद व्यक्त करणे चुकीचे नाही.”
संदीप शर्मा यांनी लिहिले, ‘अशा प्रकारे बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. काही लोकांनी पोलिसांत असणे म्हणजे त्यांचे सार्वजनिक जीवन संपले आहे, अशा थाटात त्यांना बदनाम करण्याचा ट्रेंड चालविला आहे.’