बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता झाल्यानंतर आणि त्याच्या अगोदरही सूरज चव्हाण याची एक मोठी क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळाली. सूरज हा बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. हेच नाही तर घरातील काही लोक सतत सूरजच्या चुका काढताना दिसले. हेच नाही तर फिनाले विकमध्येही अंकिता वालावलकर ही सूरज चव्हाण याने जेवताना अन्न टेबलवर सांडले, यासाठी त्याला बोलताना दिसली. त्याच्या खाण्यावरून आणि राहण्यावरून सतत त्याला बोलले जात होते. मात्र, दुसरीकडे लोकांना सूरजचा अंदाज जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळाले.
घरातील सदस्य जवळपास सर्वच विकमध्ये सूरजला नॉमिनेशमध्ये टाकताना दिसले. मात्र, असे असतानाही तो शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात टिकून राहिला. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निकी तांबोळी हे बिग बॉस मराठीच्या टॉप 3 पर्यंत पोहोचले. त्यानंतर निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि सूरज आणि अभिजीत फायनलमध्ये पोहोचले.
थेट सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता झाला. आता नुकताच सूरज चव्हाण याने अजित पवार यांची भेट घेतलीये. हेच नाही तर अजित पवार यांच्याकडून सूरज चव्हाणचा सत्कार हा करण्यात आलाय. अजित पवार यांनी जाहीर केले की, ते सूरजला त्याच्या मुळगावी घर बांधून देणार आहेत. यासोबतच त्यांनी अजून एक मोठी घोषणा केली.
अजित पवार हे म्हणाले की, सूरजच्या भविष्यासाठी मी रितेश देशमुख याच्यासोबत चर्चा करणार आहे. रितेश देशमुखसोबत सूरजसाठी चर्चा अजित पवार करणार म्हणजेच सूरज भविष्यात अजून मोठ्या चित्रपटात दिसू शकतो. बिग बॉसच्या घरात असतानाच सूरजला चित्रपटाची ऑफर झालीये. त्याने आपल्या चित्रपटाबद्दल देखील माहिती शेअर केली.
बिग बॉस मराठीला रितेश देशमुख हा होस्ट करताना दिसला. बऱ्याचदा रितेश देशमुख हा सूरजचे काैतुक करताना देखील दिसला. आता थेट अजित पवार हेच रितेशला सूरजसाठी बोलणार आहेत. आता सूरज चव्हाण आणि अजित पवार यांच्या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.