बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल माहिती देत असते. श्रद्धा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात.
श्रद्धा कपूरने आज तिच्या देसी लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत, हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
श्रद्धाने रेड आउटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत. तिने लाईट मेकअप केला आहे आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे.
श्रद्धा फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करत पिंक फ्लॉवर पोस्ट केलं आहे.
चाहत्यांच्या नजरा श्रद्धाच्या फोटोंपासून हटवल्या जात नाहीत. चाहते तिच्या फोटोंवर कमेंट्स करत आहे. एका चाहत्यानं लिहिले - Uffff. तर दुसऱ्याने लिहिलं - खूप सुंदर.