मुंबई – रवीद्र जैन (ravindra jain) यांचं नाव जरी तुमच्या कानावर पडलं तरी तुम्हाला रामायणातल्या (ramayan) रामानंद सागर (ramanand sagar) यांची आठवण होईल कारण त्यांना जो मधुर आवाज देण्यात आला होता. तो आवाज रविंद्र जैन याचा होता. रविंद्र जैन हे दृष्टीहीन होते. परंतु संगीतकार म्हणून त्यांनी कारर्कीद अतिशय चांगली राहिली आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे आज त्यांच्या करिअर आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1944 मधील म्हणजे स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्माच स्थळ आहे उत्तर प्रदेशातील अलीगढ, रविंद्र जैन यांचं लहान असल्यापासून एक संगीत क्षेत्राशी अत्यंत जवळचं नात राहिलं आहे. त्यांच्या चांगल्या आवाजामुळे मनोरंजन क्षेत्रात त्यांनी उत्तम नाव कमावलं आहे.
संगीत शिकण्यासाठी काकाचं घर गाठलं
संगीत क्षेत्र लहानपणापासून आवडत असल्यामुळे रविद्र जैन यांनी आपलं पाऊल लहान असताना संगीत क्षेत्रात ठेवलं असल्याचं पाहायला मिळत. त्यांनी संगीत शिकण्यासाठी लहान असताना त्यांच्या काकांचं घर गाठलं होतं. कोलकत्त्यामध्ये त्यांनी काकांच्या घरी आल्यानंतर त्यांनी संगीत शिकून घेतलं. नंतर त्यांनी राधेश्याम झुणझुणवाला यांच्याकडे संगीत शिकण्याचं ठरवलं तिथं त्यांनी संगीत शिकल्यानंतर त्यांचा मोर्चा त्यांनी मुंबईकडे वळवला आणि ते मुंबईत दाखल झाले. संगीत शिकत असताना त्यांच्या मुंबईतल्या काही मंडळींशी त्यांच्या ओळखी असल्याने ते मुंबईत दाखल झाले.
चित्रपट पडला पण त्यांचं गाण हीट झालं
राजश्री प्रोडक्शनच्या सौदागर चित्रपटात त्यांना संगीत देण्याचा पहिला चान्स मिळाला. त्यावेळी तो चित्रपट लोकांच्या पसंतीला पडला नाही किंवा आवडला नाही, परंतु त्यातलं गाण सजना है मुझे सजना के लिए हे गाण मात्र प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यामुळं रविंद्र जैन हे चर्चेत राहिले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्यामध्ये राम तेरी गंगा मैली, हिना, इंसाफ का तराजू, दुल्हन वही जो पिया मन भाए, अखियो के झरोखो से अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं त्यामुळे त्यांनी लोकांच्या मनावर अधिक राज्य गाजवलं, कारण त्यांनी संगीत दिलेली गाणी आजही लोक गुंगताना दिसतात.