‘मुंबईच्या हवेत गटारासारखी दुर्गंधी’; जुही चावलाच्या ट्विटवर फडणवीसांचं उत्तर, म्हणाले..

| Updated on: Oct 31, 2022 | 7:46 PM

हवेतील दुर्गंधीची तक्रार करणाऱ्या जुही चावलाला फडणवीसांचा सल्ला

मुंबईच्या हवेत गटारासारखी दुर्गंधी; जुही चावलाच्या ट्विटवर फडणवीसांचं उत्तर, म्हणाले..
Juhi Chawla and Devendra Fadnavis
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई- अभिनेत्री जुही चावला नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर बेधडकपणे आपली मतं मांडते. नुकतंच जुहीने दक्षिण मुंबईतील एका समस्येविषयी ट्विट केलं होतं. हवेत विचित्र दुर्गंधी येत असल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी फडणवीसांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी एका पत्रकाराने जुही चावलाच्या ट्विटबाबत त्यांना प्रश्न विचारला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, देवेंद्र फडणवीस म्हणाले “मुंबई हे एक महान शहर आहे. हे खरंय की शहरात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. महानगरपालिकेतील भ्रष्टाचारामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मात्र आता सरकार बदललंय. आता मुंबई बदलत आहे. त्यामुळे मुंबईबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्यामुळे सेलिब्रिटींनी अशा पद्धतीचं विधान करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा.”ॉ

हे सुद्धा वाचा

तुम्हालाही तुमच्या परिसरातील हवेत दुर्गंधी येत आहे का, असा प्रश्न जुहीने तिच्या ट्विटमधून विचारला होता. ‘कोणी या गोष्टीचं निरीक्षण केलंय का, की मुंबईतल्या हवेतून दुर्गंधी येत आहे? आधी खाडीजवळून जाताना असा दुर्गंध यायचा. आता दक्षिण मुंबईतील बऱ्याच भागात अशी दुर्गंधी येतेय. एका विचित्र रासायनिक प्रदूषित हवेचाही वास पसरत आहे. दिवस आणि रात्री ही दुर्गंधी येतेय. आम्ही गटारात राहतोय की काय, असं वाटू लागलंय’, असं ती म्हणाली होती.

जुहीच्या या ट्विटवर काहींनी त्यांनासुद्धा अशीच समस्या जाणवत असल्याची तक्रार केली. तर काहींनी तिला ट्रोल करत दुसऱ्या जागी राहायला का जात नाही, असा उलट प्रश्न विचारला.