Devmanus: ‘देवमाणूस’ मालिकेत विलक्षण वळण; लोकांच्या जीवाशी खेळणारा बनणार दुसऱ्याच्या हातातलं खेळणं

| Updated on: Feb 25, 2022 | 1:14 PM

नुकतंच प्रेक्षकांनी (Devmanus) मालिकेत पाहिलं कि डॉक्टरने डिंपलसोबत हातमिळवणी केली आहे. आता हे दोघे मिळून डाव आखणार इतक्यातच एक नवीन चेहऱ्याची एण्ट्री झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

Devmanus: देवमाणूस मालिकेत विलक्षण वळण; लोकांच्या जीवाशी खेळणारा बनणार दुसऱ्याच्या हातातलं खेळणं
Devmanus
Follow us on

देवमाणूस (Devmanus) या मालिकेने (Marathi Serial) पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील विलक्षण वळण प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि डॉक्टरने डिंपलसोबत हातमिळवणी केली आहे. आता हे दोघे मिळून डाव आखणार इतक्यातच एक नवीन चेहऱ्याची एण्ट्री झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सोनाली या नवीन भूमिकेची ओळख नुकतीच मालिकेत प्रेक्षकांना झाली. सोनाली ही डॉक्टरांकडे तिच्या जमिनीच्या निमित्ताने मदत मागायला येते. समोरून मदत मागायला आलेल्या सोनालीला मदत करायची संधी डॉक्टर हातातून कशी निसटू देतील. त्यातही डॉक्टर आणि डिंपल एकत्र आले आहेत. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडेल हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. (Kiran Gaikwad)

महाएपिसोडच्या महाघडामोडी
नीलमचा मर्डर झाल्यामुळे अजित पूर्णपणे गोंधळात आहे. डिम्पल अजितला पोलिसांच्या जाळ्यात अडकवते. जयसिंग बायकोला शोधतोय आणि अजितच्या रूममध्ये पोलीस दारू प्यायला बसले आहेत, त्यामुळे अजित पूर्णपणे अडकला आहे. नीलमची बॉडी बाहेर घेऊन जाताना पोलीस पकडतील याची त्याला भीती आहे. इतक्यात डिम्पल अजितला माफी मागून तिला पार्टनर करून घ्यायची मागणी करते.

नुकतंच या मालिकेत देवमाणसाची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने एक प्रसंग चित्रित करताना आलेला अनुभव सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितला. मालिकेचं चित्रीकरण करत असताना असा काही प्रसंग चित्रित करावा लागेल अशी कल्पना देखील नव्हती असं देखील तो म्हणाला. हा नक्की कुठला प्रसंग आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अनेक तर्कवितर्क लावत असतानाच या मालिकेतील डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणाली, “डिंपल या पात्राने नाव आणि ओळख मिळवून दिली. प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. पण नुकताच मालिकेतला एक प्रसंग चित्रित करताना अंगावर काटा आला. हा प्रसंग चित्रित करण्याआधी मी खूप घाबरले होते आणि नकारही दिला होता. पण दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी प्रोत्साहन दिल्यानंतर हा प्रसंग चित्रित झाला. कलाकार म्हणून डिंपलची व्यक्तिरेखा निभावताना जितकी गंमत येते तितकाच कधी कधी त्रासही होतो.”

संबंधित बातम्या: ‘ज्यांना माझं काम नाही आवडलं त्यांना…’, ‘देवमाणूस’ मालिकेतील डॉक्टर अजित कुमार देवची खास पोस्ट

संबंधित बातम्या: ‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना

संबंधित बातम्या: जाऊया डबल सीट रं… ‘देवमाणूस’मधील एसीपी दिव्याचा हवालदार शिखरेंसोबत भन्नाट डान्स