देवोलीना भट्टाचार्जीच्या मित्राची अमेरिकेत गोळी झाडून हत्या, अभिनेत्रीने मोदींकडे केली ‘ही’ मागणी

| Updated on: Mar 03, 2024 | 1:31 PM

Devoleena Bhattacharjee | देवोलीना भट्टाचार्जीच्या मित्राची अमेरित सर्वांसमोर गोळी झाडून हत्या, मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु, अभिनेत्रीने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली मोठी मागणी... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या मित्राची सर्वत्र चर्चा...

देवोलीना भट्टाचार्जीच्या मित्राची अमेरिकेत गोळी झाडून हत्या, अभिनेत्रीने मोदींकडे केली ही मागणी
Follow us on

मुंबई | 3 मार्च 2024 : अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत मित्र अमरनथ घोष याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती दिली आहे. संबंधीत घटना 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली आहे. देवोलिनी हिने पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परदेश मंत्री एस जयशंकर यांना देखील टॅग केलं आहे. अमरनथ घोष याचं पार्थिव अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी भारत सरकारने मदत करावी… यासाठी पोस्ट लिहिली आहे.

अमरनथ घोष अमेरिकेत एकटाच राहात होता. त्याच्या आई – वडिलांचं देखील निधन झालं आहे. देवोलिना हिने एक्सवर भावूक पोस्ट लिहित भारत सरकारने याप्रकरणी मदत करावी अशी मागणी केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त देवोलिना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

पोस्टमध्ये देवोलिना म्हणाली, ‘माझा मित्र अमरनथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी सेंट लुईस अकादमीजवळ गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे, त्यात्या कुटुंबात तो एकटाच होता. तीन वर्षांपूर्वी त्याच्या आईचं निधन झालं आहे. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला..’

 

 

‘अमरनथ घोष याची हत्या का करण्याता आली याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. त्याच्या कुटुंबात फक्त काही मित्र होते. त्यांच्या नातेवाईक नाहीत, त्यामुळे त्याच्यासाठी कुटुंबातील कोणी लढू शकत नाही. अमरनथ घोष कोलकाता येथील राहणारा आहे…’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘तो फार उत्तम डान्सर होता आणि PHD करत होता. संध्याकाळी चालायला जात असताना त्यावर अज्ञात व्यक्तीन गोळी झाडून हत्या करण्यात आली. अमेरिकेतील काही मित्र मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. भारतीय दूतावासकडे विनंती आहे, हत्येचं कारण तरी कळायला हवं…’ असं देखील देवोलीना भट्टाचार्जी म्हणाली आहे.