युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटानंतर धनश्री पहिल्यांदाच कॅमेरासमोर; दिली ही प्रतिक्रिया

| Updated on: Feb 23, 2025 | 9:04 AM

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा हे लग्नाच्या पाच वर्षांतच विभक्त होत आहेत. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान धनश्री पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली. पापाराझींनी तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटानंतर धनश्री पहिल्यांदाच कॅमेरासमोर; दिली ही प्रतिक्रिया
धनश्री वर्मा, युजवेंद्र चहल
Image Credit source: Instagram
Follow us on

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाल्याचं वृत्त समोर येत आहे. धनश्री आणि युजवेंद्र यांनी घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर धनश्रीला नुकतंच मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. नेहमीप्रमाणे ती स्टायलिश अंदाजात पापाराझींसमोर आली आणि फोटोसाठी तिने पोझ दिले. यावेळी धनश्रीने हसत पापाराझींशी संवादसुद्धा साधला. घटस्फोटानंतर धनश्री पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पापाराझींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये धनश्री तिच्या कारमधून बाहेर पडते आणि एअरपोर्टच्या दिशेने चालू लागते. यावेळी तिने काळ्या रंगाचा टॉप आणि बॅगी जीन्स परिधान केला होता. एअरपोर्टवर पापाराझी सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करण्यासाठी उभेच असतात. यावेळी धनश्रीनेही त्यांच्यासमोर फोटोसाठी पोझ दिले. त्यानंतर एकाने तिला विचारलं, “कशी आहेस?” यावर धनश्री हसत उत्तर देते, “कामावर जातेय.” यावेळी धनश्री एका चाहत्यासोबतही हसत फोटोसाठी पोझ देते. धनश्री आणि युजवेंद्रच्या घटस्फोटाचे वृत्त सध्या माध्यमांमध्ये आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्या विभक्त होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र अशात धनश्री अत्यंत संयमाने सर्वांसमोर वागताना दिसली.

हे सुद्धा वाचा

धनश्री आणि युजवेंद्र यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती धनश्रीच्या वकिलांनी दिली. त्याचप्रमाणे घटस्फोटाबाबत कोणतंही वृत्त जाहीर करण्यासाठी तथ्य तपासून पाहण्याची विनंती तिच्या वकिलांनी केली. यादरम्यान धनश्रीच्या कुटुंबीयांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धनश्रीने युजवेंद्रकडून 60 कोटी रुपये पोटगी मागितल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. या चर्चांना त्यांनी फेटाळलं आहे. “पोटगीबाबत पसरवल्या जाणाऱ्या तथ्यहीन वृत्तांबद्दल आम्हाला खूप राग आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की धनश्रीकडून अशी कोणतीही रक्कम मागितली गेली नाही. या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही”, असं त्यांनी म्हटलंय. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टातील सुनावणीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्रने स्पष्ट केलंय की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.