Anita Raj-Dharmendra Affair : प्रेम एक अशी भावना आहे… जी कधीही विसरता येत नाही… बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्या आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच लव्हस्टोरी पैकी एक अभिनेत्री धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांची आहे. एका काळ असा होता जेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोर धरु लागल्या. पण हेमा मालिनी यांच्यानंतर देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने धर्मेंद्र यांच्या मनात स्वतःसाठी खास जागा निर्माण केली. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. कारण जेव्हा हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल माहिती झालं, तेव्हा धर्मेंद्र यांनी मोठा निर्णय घेतला.
हेमा मालिनी यांच्यानंतर धर्मेंद्र यांचं नाव अनिता राज यांच्यासोबत जोडण्यात आलं. अनिता राज यांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘अच्छा बुरा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मोठ्या पडद्यावर अनिता राज आणि धर्मेंद्र यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. अनिता राज आणि धर्मेंद्र यांनी ‘नौकर बीवी का’,’जलजला’ आणि ‘करिश्मा कुदरत का’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. . (Dharmendra Hema Malini Affair)
मीडियारिपोर्टनुसार , सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अनिता राज आणि धर्मेंद्र यांच्यात प्रेम बहरला. जेव्हा या गोष्टीबद्दल हेमा मालिनी यांना कळालं तेव्हा अनिता राज आणि धर्मेंद्र यांनी अनिता यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनिता राज आणि धर्मेंद्र कधीच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले नाहीत.
बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अनिता राज हिने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. छोट्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर अनिता राज यांनी १९८६ साली निर्माते सुनील हिंगोरानी यांच्यासोबत लग्न केलं. अनिता राज आणि सुनील हिंगोरानी यांना शिवम नावाचा एक मुलगा देखील आहे.
अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. (dharmendra first movie)