ऋतिक रोशनचे माजी सासरे आणि झायेद खानचे वडील संजय खान हे 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचा मोठा भाऊ त्यांच्यापेक्षाही प्रसिद्ध होता, त्याचे नाव फिरोज खान होते. संजय खान यांनी नुकताच आपला 84 वा वाढदिवस साजरा केला आहे. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित एक प्रसिद्ध घटना. संजय खान बद्दल इंडस्ट्रीत अनेक गोष्टींची चर्चा होत असली तरीही ही गोष्ट धर्मेंद्र यांच्याशी संबंधित आहे. धर्मेंद्र हे जेवढे उदार म्हणून ओळखले जातात तेवढेच ते आपल्या काळात रागीष्ट होते असे सांगितले जाते. आपल्या मेहनतीने त्यांनी इंडस्ट्रीमध्ये ते स्थान निर्माण केले होते ज्यासाठी लोक नेहमीच धडपड करत असतात. धर्मेंद्र बद्दल देखील अनेक गोष्टी प्रसिद्ध आहे की ते खूप पार्टी करायचे आणि संजय खानशी संबंधित ही गोष्ट देखील एका पार्टी मध्ये घडली आहे.
धर्मेंद्रने संजय खानला मारली होती कानाखाली
धर्मेंद्र आणि संजय खान यांनी 1964 मध्ये आलेल्या हकीकत या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटातून अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर धर्मेंद्र यांनी सर्वांशी चांगली ओळख करण्यासाठी पार्टी आयोजित केली होती. लोकांसोबत बोलण्यासाठी आणि त्यांना समजून घेण्यासाठी धर्मेंद्र पार्टीचे आयोजन करायचे. या पार्टीला संजय खानलाही आमंत्रित करण्यात आले होते. शूटिंग मधून शिफ्ट संपवून जेव्हा संजय खान या पार्टीला पोहोचले तेव्हा धर्मेंद्र यांची पार्टी असल्याने त्यांनी संजय खानला वेलकम ड्रिंक दिली.
पार्टी सुरू झाल्यानंतर संजय खानने एवढी दारू प्यायली की ते खूप मद्यधुंद झाले आणि फिल्म इंडस्ट्री बद्दल तोंडाला येईल तसे बोलू लागले. प्रकरण आणखीन बिघडू नये म्हणून धर्मेंद्र यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र संजय खान दारूच्या नशेत खूप बोलले. त्या वेळचे प्रसिद्ध अभिनेते ओमप्रकाश यांना शिवीगाळ सुरु केल्याने प्रकरण वाढले. धर्मेंद्र हे ओमप्रकाश यांची खूप इज्जत करायचे त्यांना मान द्यायचे. या प्रकारानंतर धर्मेंद्रला राग आला आणि त्यांनी संजय खान यांना सर्वांसमोर कानाखाली मारली.
धर्मेंद्र यांनी मागितली होती फिरोज खानची माफी
संजय खान हे काहीही न बोलता तिथून बाहेर पडले होते आणि नंतर धर्मेंद्र यांना त्यांची चूक समजली. धर्मेंद्रला त्यांची चूक समजल्यानंतर त्यांनी फिरोज खानची माफी मागितली. दुसऱ्याच दिवशी धर्मेंद्र फिरोज खानच्या घरी पोहोचले आणि संजय खानला भेटायचे असल्यास सांगितले. फिरोज खान यावेळी म्हणाले होते की “तो चुकीचा बोलला होता त्यामुळे तुम्ही त्याला त्याची शिक्षा दिली तुम्ही योग्यच केले जर मी त्या जागी असतो तर मी देखील तेच केले असते”. नंतर संजय खान यांनीही हे प्रकरण विसरून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि प्रीमियर मध्ये दोघांनीही गळाभेट घेतली होती.