मुंबई | अभिनेते धर्मेंद्र फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असतात. धर्मेंद्र यांनी वयाच्या २५ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं लग्न झालं होते. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर असं असून त्यांना चार मुलं आहेत. धर्मेंद्र यांचं कुटुंब झगमगत्या विश्वापासून दूर असतं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या मुलांची नावे सनी, बॉबी असून मुलींची नावे विजेता आणि अजीता अशी आहेत.. नुकताच करण देओल याच्या लग्नासाठी देओल कुटुंब एकत्र आलं होतं.
धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, पहील्या पत्नीपासून घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत १९८० मध्ये दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींची नावे ईशा देओल आणि आहना देओल अशी आहेत. अभिनेत्री ईशा देओल कायम तिच्या आई – वडिलांबद्दल सांगत असते.
एकदा सिमी ग्रेव्हाल यांच्या शोमध्ये ईशा देओल हिने मोठा खुलासा केला होता. हेमा म्हणाल्या होत्या की, ‘धर्मेंद्र एक उत्तम पती आणि पिता आहेत. पण मुलींबद्दल धर्मेंद्र अधिक पारंपरिक आहेत. मुलींनी वेस्टर्न कपडे घालणं त्यांना आवडत नाही. धर्मेंद्र यांना मुलींना कायम पारंपरिक कपड्यांमध्ये पाहायला आवडतं.’
पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘धर्मेंद्र जेव्हा समोर असायचे तेव्हा अहाना आणि ईशा पारंपरिक ड्रेस घालायच्या. धर्मेंद्र जेव्हा घरी यायचे तेव्हा ईशा आणि अहाना कपडे बदलायच्या आणि पारंपरिक कपडे घालायच्या.. धर्मेंद्र यांचा वेस्टर्न कपड्यांना विरोध नाही, पण त्यांना त्यांच्या मुली ड्रेसमध्ये पाहायला आवडायचं.’ असं हेमा मालिनी म्हणाल्या..
एवढंच नाही तर, ईशा देओल हिने देखील वडिलांबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. ईशा म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मी वडिलांना विचारलं होतं. त्यांनी सुरुवातील परवानगी दिली नव्हती.’ जेव्हा ईशाने बॉलिवूडमध्ये केलं होतं, तेव्हा धर्मेंद्र लेक ईशा हिच्यासोबत तब्बल ६ महिने बोलले नव्हते..
वडील धर्मेंद्र यांच्याबद्दल पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ते रोज मला आणि आईला भेटायला यायचे. फार कमी काळ ते आमच्यासोबत असयाचे. पण एक वेळचं जेवण आम्ही एकत्र करायचो..’ असं देखील ईशा देओल म्हणाली.. सध्या सर्वत्र हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे…
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट म्हणजे, आज पर्यंत हेमा मालिनी लग्ननंतर मुख्य घाराची पायरी चढल्या नाहीत. लग्नानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी करत हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला..