सुपरस्टार धर्मेंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत धर्मेंद्र चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता देखील धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यातील खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. दोघांच्या व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत एका सिनेमातील सीनचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘मित्रांनो मी शुटिंग करणं विसरून जातो जेव्हा भूमिका उत्तम असते…’ असं लिहिलं आहे. धर्मेंद्र यांनी व्हिडीओ पोस्ट करताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांना देखील धर्मेंद्र – हेमा मालिनी यांचा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
pic.twitter.com/73Mi9Yb1UQ Friends, when the role is good i don’t act.
— Dharmendra Deol (@aapkadharam) March 29, 2024
धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एक चाहता म्हणाला, ‘माइंड ब्लॉइंग…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘व्हिडीओ मस्तच आहे…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पंजाबी देशी स्टाईल अभिनय… मस्तच सर…’ चौथा नेटकरी म्हणाला, ‘गॉड गिफ्टेड अभिनेता…’ अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर, 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रतीज्ञा’ सिनेमातील हा सीन आहे. सिनेमात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यासोबत अजीत खान, अजीत देओल, जगदी आणि व्ही गोपाल मुख्य भूमिकेत होते. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी केलं होतं.
‘प्रतीज्ञा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठा गल्ला जमवला… सिनेमात धर्मेंद्र यांनी साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आज देखील धर्मेंद्र यांचे अनेक सिनेमे चाहते आनंदाने आणि उत्सहाने पाहत असतात.
सांगायचं झालं तर, धर्मेंद्र – हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. शोले, सीता और गीता, राजा और रानी आणि बगावत यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. आज देखील दोघांच्या जोडीला चाहते विसरू शकलेले नाहीत.