थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है। या एका डायलॉगमुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये सोनाक्षी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. सोनाक्षीचे फॅन्स आणि अनेक सेलिब्रिटी तर तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. अशात सोनाक्षी हिच्याबद्दल काही अशा गोष्टी जाणून घेऊ ज्या फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या सर्वत्र सोनाक्षी हिची चर्चा रंगली आहे.
सोनाक्षी हिचा जन्म 2 जून 1987 साली पाटना याठिकाणी झाला होता. सोनाक्षी हिच्या शालेय शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचं शालेय शिक्षण मुंबई येथील आर्य विद्या मंदीर येथून झालं आहे. मुंबईतील श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ येथून सोनाक्षी हिचं शिक्षण झालं. शिवाय अभिनेत्री फॅशन डिझायनिंगमधून ग्रॅज्यूएशन केलं आहे.
सोनक्षी हिने करियरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून केली. त्यानंतर अभिनेत्री 2010 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘दबंग’ सिनेमात अभिनेत्री सलमान खान याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली. ‘दबंग’ सिनेमांमुळेच सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता आलं.
गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. रिपोर्टनुसार, सोनाक्षी हिची नेटवर्थ तब्बल 74 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षी एका सिनेमासाठी तब्बल 4 कोटी मानधन घेते… सोनाक्षी हिने मुंबईत स्वतःचं घर देखील घेतलं आहे. शिवाय अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये सोनाक्षी हिने खलनायकाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्रीची नवी भूमिका चाहत्यांना देखील प्रचंड आवडली. सोशल मीडियावर देखील सोनाक्षी हिचे सीरिजमधील अनेक सीन व्हायरल झाले.
सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.