भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न असल्यामुळे सर्वत्र अंबानी कुटुंबात होणाऱ्या कर्यक्रमांची चर्चा चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी हे 12 जुलै रोजी राधिका मर्चंट सोबत लग्न करणार आहेत. सध्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी आणि पाहुणे मंडळी हजेरी लावताना दिसत आहेत. लग्नाआधी सुरु असलेल्या विधींना मुकेश अंबानी – नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या सासूबाई स्वाती पिरामल यांनी देखील हजेरी लावली होती.
सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अनंत – राधिका यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, ईशा अंबानी यांच्या सासूबाई स्वाती पिरामल यांचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल दिसत. स्वाती पिरामल यांची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्यांची चर्चा रंगू लागली आहे.
ईशा अंबानी यांच्या सासूबाईंचं नाव स्वाती पिरामल आहे, तर सासऱ्यांचं नाव अजय पिरामल असं आहे. ईशा अंबानी यांचे सासू – सासरे देखील देशातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. अजय गोपीकिसन पिरामल हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि पिरामल समूहाचे अध्यक्ष आहेत.
स्वाती पिरामल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2010 ते 2014 पर्यंत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषद आणि पंतप्रधानांच्या व्यापार परिषदेच्या सदस्या होत्या. स्वाती पिरामल यांच्या खांद्यावर एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीच्या व्हाईस चेअरपर्सनची जबाबदारी आहे. याशिवाय त्या मुंबईतील गोपालकृष्ण पिरामल हॉस्पिटलच्या संस्थापक म्हणून देखील काम पाहातात.
स्वाती पिरामल यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे. स्वाती पिरामल यांना 2015 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वाती पिरामल यांचं नाव जगातील 25 पॉवरफुल महिलांच्या यादीत 8 वेळा सामील झालं आहे.