Mithun Chakraborty Personal Life: बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. एक काळ असा होता, जेव्हा मिथुन चक्रवर्ती त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले होते. मिथुन दा आता पत्नी योगिता बाली यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण योगिता बाली मिथुन दा यांच्या पहिल्या पत्नी नसून दुसऱ्या पत्नी आहे. मिथुन दा यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हेलेना लूके असं होतं. पण हेलेना आणि मिथुन दा यांचं लग्न फार काळ टिकलं नाही.
हेलेना एका भारतीय – अमेरिकन अभिनेत्री आहे. हेलेना यांनी ‘दो गुलाब’, ‘आओ प्यार करें’, ‘भाई आखिर भाई होता है’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना हेलेना यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार, हेलेना आणि मिथुन चक्रवर्ती यांचं लग्न 1979 मध्ये झालं होतं.
रिपोर्टनुसार, हेलेना यांनी एका मुलाखतीत मिथुन दा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर खुलासा केला. ‘मिथुन यांच्यासोबत लग्न करणं माझी एक चूक होती. चार महिन्यांचं लग्ना माझ्यासाठी एक वाईट स्वप्नासारखं होतं. मिथुन यांनी माझ्यावर कधी प्रेम केलंच नव्हतं… याची मला खात्री पटली होती…’
घटस्फोटानंतर हेलेना यांनी मिथुन दा यांच्याकडून एक रुपया देखील घेतला नाही. घटस्फोटानंतर मनातील खंत व्यक्त करत हेलेना म्हणाल्या, ‘मिथुन फक्त स्वतःवर प्रेम करायचे. त्यांना माझी किंमत नव्हती.. ते कायम माझ्यावर संशय घ्यायचे… त्यांना कायम वाटयचं की, मी आजही माझा एक्सबॉयफ्रेंड जावेद याला भेटते.’ असं देखील मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी म्हणाल्या होत्या. हेलेना आणि मिथुन दा यांच्या नात्याचा शेवट फार वाईट झाला.
मिळालेल्या माहितीनुसीर, हेलेना आता अमेरिकेत राहतात. तिथे त्या एका एअरलाईन्स कंपनीसोबत काम करतात असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीच्या काळात चांगले सिनेमे केल्यानंतर त्यांनी भारत सोडला आणि परदेशात शिफ्ट झाल्या.