तब्बू हिचं पाकिस्तानशी कनेक्शन…, अभिनेत्रीचं खरं नाव आणि कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती

| Updated on: Oct 09, 2024 | 12:49 PM

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिचं खरं नाव आणि कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती, अभिनेत्रीचा थेट पाकिस्तानशी कनेक्शन... तब्बू कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

तब्बू हिचं पाकिस्तानशी कनेक्शन..., अभिनेत्रीचं खरं नाव आणि कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती
Follow us on

Tabu connection with Pakistan: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्याचं कनेक्शन पाकिस्तान सोबत आहे. अभिनेत्री तब्बू हिचं देखील पाकिस्तान सोबत कनेक्शन आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचं खरं नाव देखील फार कमी लोकांना माहिती आहे. 4 नोव्हेंबर 1971 मध्ये जन्म झालेल्या तब्बू हिचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाशमी असं आहे. तब्बू हिचा जन्म जमाल अली हाशमी आणि रिझवाना यांच्या घरात झाला. अभिनेत्रीचे वडील जमाल पाकिस्तानचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते. 1970 च्या दशकात जमाल यांनी अनेक हीट सिनेमे इंडस्ट्रीला दिले.

पण जमाल यांनी बायको रिझवाना आणि दोन मुलींची साथ सोडली. तेव्हा तब्बू फक्त तीन वर्षांची होती. तेव्हा तब्बू तिच्या आईसोबत भारतात आली. तब्बू हिने वयाच्या 11 व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नौजवान’ सिनेमात अभिनेत्री झळकली. तेव्हा तब्बू फक्त 14 वर्षांची होती.

हे सुद्धा वाचा

 

 

1994 च्या विजयपथमध्ये अभिनेता अजय देवगनसोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर तब्बूला ओळख मिळाली. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर तब्बू हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक सिनेमांमध्ये तब्बूने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

तब्बू प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली. पण खाजगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. तब्बूच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली. पण त्या नात्यामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात कायमचा एकटेपणा आला.

 

 

तब्बू आणि अभिनेते नागार्जुन यांनी एकमेकांना तब्बल 10 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. कारण तेव्हा नागार्जुन विवाहित होते. त्यामुळे त्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिलं आणि प्रेमाचा त्याग केला. त्यानंतर तब्बू यांनी कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. आज वयाच्या 52 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे.