Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजा बिग बींना कोणत्या ओळखीची गरज नाही. बिग बी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत असतात. पण अमिताभ बच्चन यांचं खरं नाव आणि त्यांची जात फार कमी लोकांना माहिती आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी यावर खुलासा केला होता.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते उत्तर प्रदेशातील आहे. बिग बी कायस्थ कुटुंबातील होते आणि त्यांची आई शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ बच्चन यांचं खरं नाव इंकलाब श्रीवास्तव असं आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वतःचं आडनाव बदललं आहे. श्रीवास्तव हे आडनाव बदलून बिग बी यांनी स्वतःचं आडनाव बच्चन असं केलं. याबद्दल खुद्द अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता.
‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी मोठा खुलासा केला होता. बिग बी यांनी सांगितलं होतं बच्चन हे नाव त्यांचे वडील श्री हरिवंश राय बच्चन यांची देन आहे. ‘माझ्या आई – वडिलांना मला कोणत्या बंधनात अडकवायचं नव्हतं. मी माझ्या आटींवर आयुष्य जगावं अशी त्यांची इच्छा होती. कवी असल्यामुळे वडिलांना बच्चन आडनाव मिळालं होतं. शाळेत जेव्हा माझं एडमिशन झालं तेव्हा शिक्षकांनी नाव विचारलं तेव्हा वडिलांनी बच्चन असं नाव सांगितलं, तेव्हा पासून मला बच्चन नाव मिळालं.’
पुढे बिग बी म्हणाले, ‘आमच्या आडनावावरून कोणी आमच्या जातीबद्दल माहिती काढू शकत नाही. त्यामुळे वडिलांना असा निर्णय घेतला होता. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की माझा अशा घरात आणि बच्चन नावासोबत जन्म झाला…’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले होते.
आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे. बिग बी यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. शिवाय बिग बींची एक झलक पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग बी कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात.