Sushant Singh Rajput birthday : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. छोट्या पडद्यापासून आपल्या करियरला सुरुवात करणाऱ्या सुशांत याने बॉलिवूडमध्ये देखीव स्वतःचं नाव मोठं केलं. पण अभिनेत्याला मेहनतीने मिळालेलं यश टिकवता आलं नाही… बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिल्यानंतर सुशांत याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. आज सुशांत याच्या निधनानंतर देखील त्याला कोणी विसरू शकलेलं नाही. आज सुशांत याचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्याबद्दल कोणालाच कधी न कळलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत याची चर्चा रंगली आहे.
चित्रपटगृहात गुपचूप जायता अभिनेता : सुशांत याने अनेकदा चित्रपटगृहात जाऊन चाहत्यांमध्ये बसून सिनेमा पाहिला आहे. सिनेमा संपल्यानंतर अभिनेता चाहत्यांसमोर यायचा. स्वतःचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुशांत याने अनेकदा चाहत्यांमध्ये बसून एक प्रेक्षक म्हणून स्वतःचा सिनेमा पाहिला आहे. सुशांत याची ही सवय फार कमी चाहत्यांना माहिती आहे.
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासाठी देखील अभिनेत्याने काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सुशांत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायचा. सर्वात प्रथम सुशांत याने कॉमन वेल्थ गेमच्या क्लोसिंग सेरेमनीमध्ये ऐश्वर्या हिच्यासोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ‘धूम 2’ सिमेमात देखील सुशांत याने हृतिक याच्यासोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं.
सुशांत याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेता फक्त अभिनयातच नाही तर, अभ्यासात देखील प्रचंड आनंदी होता. त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं. सुशांत याने फक्त तीन वर्ष इंजिनीअरिंगचा अभ्यास केला. त्यानंतर सुशांत याने शिक्षण सोडूवन अभिनयाकडे वाटचाल सुरु केली. एवढंच नाही तर, फिजिक्स नॅशनल ऑलिम्पियाडचा विजेताही होता. त्याने सुमारे 11 अभियांत्रिकीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या.
सुशांत याही खगोलशास्त्रात खूप रस होता. त्याच्याकडे अनेक प्रगत दुर्बिणी होत्या. त्याच्याकडे असलेल्या दुर्बिणींमधून सुशांत कायम चंद्र, चांदण्यांचा अभ्यास करायचा. एवढंच नाही तर, अभिनेत्याने चंद्रावर जमीन देखील विकत घेतली होती. चंद्रावर जमीन विकत घेणारा सुशांता बॉलिवूडमधील पहिला अभिनेता होता.
सुशांत याला नव्या गोष्टी शोधायला नव्या गोष्टींचा अभ्यास करायला फार आवडायचं. शिवाय अभिनेत्याकडे एक डायरी होती. डायरीमध्ये सुशांत याने त्याचे सर्व स्वप्न लिहिली होती. सुशांत सर्वसामान्य कुटुंबातील होता. पण त्याची स्वप्न फार मोठी होती. अभिनेत्याने स्वतःची अनेक स्वप्न पूर्ण देखील केली… पण सुशांत याची अनेक स्वप्न पूर्ण झाली नाहीत.