अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन करते. आज बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींनी पदार्पण केलं आहे. पण चाहत्यांमध्ये शिल्पाची असलेली आजही कमी झालेली नाही. आज शिल्पा बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. शिल्पा हिच्याबद्दल कायम रंगणारी चर्चे म्हणजे अभिनेत्रीचं फिटनेस आणी सौंदर्य… शिल्पाच्या सौंदर्यापूढे आजच्या अभिनेत्री देखील फेल आहेत.
वयाच्या 49 व्या वर्षी देंखील शिल्पा हिचं सौंदर्या कमी झालेलं नाही. आजही शिल्पा तितकीच फिट आणि सुंदर दिसते, जितकी 90 च्या दशकात दिसत होती. तर शिल्पा हिच्या सौंदर्यामागे नक्की काय रहस्य आहे जाणून घेऊ. शिल्पा शेट्टी प्रचंड फिटनेस फ्रिक आहे आणि अभिनेत्री स्वतःची प्रचंड काळजी घेते.
एका मुलाखतीत स्वतः शिल्पा हिने सांगितलं होतं की, सकाळी उठल्यानंतर अभिनेत्री कोमट पाणी पिते. कोमट पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते. शिल्पा पाण्यात आवळ्याचा ज्यूस टाकून देखील पिते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो. ज्यामुळे त्वचेमधील कोलेजन वाढण्यास मतत होते.
शिवाय शिल्पा स्वतःच्या चेहऱ्याला मॉश्चराइज करायला विसरत नाही. मॉश्चराइज केल्यामुळे स्किन सॉफ्ट राहते. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही… शिल्पा नियमित योग आणि ध्यान देखील करते ज्यामुळे अभिनेत्री शरीर आणि स्किन दोन्ही चांगलं राहतं.
शिल्पा शेट्टी कायम तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिवाय चाहत्यांना देखील वर्कआऊटच्या टिप्स देत असते. शिल्पाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, शिल्पा आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.