अभिनेता सलमान खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि आजही करत आहेत. सलमान खान याच्यानंतर अनेक नव्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण भाईजान याचं इंडस्ट्रीमध्ये असलेलं स्थान कोणी घेऊ शकलं नाही. सांगायचं झालं तर, सलमान खान याच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक दिग्दर्शकांना सलमान खान याच्यासोबत मिळून बॉलिवूडला हीट सिनेमे दिले आहेत. अशाच दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे दिग्दर्शक अली अब्बास… अली अब्बास आणि सलमान खान यांचं खास कनेक्शन आहे.
अली अब्बास आणि सलमान खान यांनी एकत्र ‘एक था टायगर’, ‘सुल्तान’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका मुलाखतीत अली अब्बास यांनी सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. जेव्हा सेटवर पॅकअप कराण्याची वेळ येते तेव्हा सलमान खान एखाद्या शाळेतील मुलासारखा असतो…
अली अब्बास म्हणाला, शुटिंग संपताच, सलमान खान पार्टीच्या मूडमध्ये येतो. तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे सर्वकाही विसरुन जातो… शाळा सुटली आहे आणि तो खूप मस्ती करतोय अशा मूडमध्ये सलमान खान असतो… सध्या सर्व फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.
सोशल मीडियावर देखील सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सलमान सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. भाईजान त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करत आरोपी फरार झाले आहेत. रविवारी पहाटे अभिनेत्याच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींना गोळीबार केला आहे. गोळीबाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पोलिसांना असे अनेक सीसीटीव्ही सापडले आहेत ज्यामध्ये दोन्ही आरोपी दिसत आहेत.