ऑक्सफर्डमध्ये शिक्षण, लाईमलाईटपासून दूर…. काय करतात ईशा अंबानी यांच्या नणंदबाई?

| Updated on: Sep 22, 2024 | 10:28 AM

Isha Ambani sister in law Nandini Piramal: कोण आहेत ईशा अंबानी यांच्या नणंदबाई, काय करतात आणि संपत्ती किती? श्रीमंत घरातील असून सुद्धा लाईमलाईटपासून दूर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा अंबानी यांच्या नणंदेची चर्चा...

ऑक्सफर्डमध्ये शिक्षण, लाईमलाईटपासून दूर.... काय करतात ईशा अंबानी यांच्या नणंदबाई?
Follow us on

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मुकेश अंबानी यांच्याप्रमाणेत त्यांची तीन मुलं देखील त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी यांच्या नणंदेची चर्चा रंगली आहे. ईशा अंबानी यांचं लग्न 12 डिसेंबर 2018 मध्ये उद्योजक आनंद पिरामल यांच्यासोबत झालं. अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. पण पिरामल कुटुंब कायम लाईमलाईटपासून दूर राहाण्याचा प्रयत्न करत असतं. आनंद पिरामल यांची बहीण नंदिनी पिरामल त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

ईशा अंबानी यांच्या नणंदबाई नंदिनी पिरामल ऑक्सफर्ड विद्यापीठातून राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहेत. नंदिनी पिरामल यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आहे. त्या पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड आणि पिरामल फार्मा लिमिटेडच्या अध्यक्षा म्हणून काम करतात.नंदिनी पिरामल ग्रुपच्या आयटी आणि एचआर विभागांचे नेतृत्व करतात. त्या कायम मीडियापासून दूर राहतात.

कंपनीच्या पाच वर्षांच्या परिवर्तन धोरणात नंदिनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश कंपनीच्या मानवी संसाधनांना बळकट करणे हा होता. याव्यतिरिक्त, त्या पिरामल फाउंडेशन आणि पिरामल सर्वजलच्या सल्लागार आहेत.

नंदिनी पिरामल यांची संपत्ती

नंदिनी पिरामल यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या संपत्तीबद्दल कोणतील माहिती समोर आलेली नाही. पण त्याचे वडील अजय पिरामल यांच्याकडे 3.5 अरब डॉलर म्हणजे जवळपास 23,307 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पिरामल कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे.

व्यवसाय क्षेत्रातील महिलांसाठी नंदिनी पिरामल यांचं योगदान प्रेरणादायी आहे. नंदिनी पिरामल ही एक उत्कृष्ट व्यावसायिक महिला आहेत. त्यांचे प्रयत्न आणि समर्पण यामुळे त्यांना व्यावसायिक जगतात महत्त्वाचे स्थान मिळालं आहे. त्यांनी स्वतःच्या विचारसरणीने आणि कार्यशैलीने समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम केले आहे.