मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ऐश्वर्या राय हिच्यासोबत झळकलेले काही अभिनेते आज बॉलिवूडपासून दूर आहेत. एका सिनेमामुळे काही अभिनेत्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण काही वर्षांनंतर बॉलिवूडमधील त्यांचं करियर फेल ठरलं. अशाच अभिनेत्यांपैकी ए़क म्हणजे अभिनेता प्रियांशू चॉटर्जी (priyanshu chatterjee). ‘दिल का रिश्ता’ (dil ka rishta) सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला प्रियांशु आता बॉलिवूडपासून दूर आहे. ‘दिल का रिश्ता’ सिनेमात प्रियांशू यांने अभिनेता अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन देखील केलं. पण प्रियांशू बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळवू शकला नाही.
‘दिल का रिश्ता’ सिनेमात प्रियांशूने ऐश्वर्याच्या पतीच्या भूमिकेला न्याय दिला होता. सिनेमात प्रदर्शित होवून २० वर्ष झाली आहेत. तेव्हा हँडसम आणि साधा दिसणाऱ्या प्रियांशूला आता ओळखणं देखील कठीण झालं आहे. सध्या सोशल मीडियावर प्रियांशूचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र प्रियांशू चॉटर्जी याच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
प्रियांशू मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असतो. शिवाय स्वतःचे फोटो देखील अभिनेता इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. अभिनेत्याच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत असतात. एवढंच नाही तर अभिनेता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर कायम स्वतःचे आणि कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
प्रियांशूच्या पोस्टवर चाहते कमेंट करत असतात. एक नेटकरी अभिनेत्याच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘हा खरंच साधा दिसणारा प्रियांशू आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रियांशूला आता ओळखणं देखील कठीण झालं आहे…’ सध्या सर्वत्र प्रियांशूच्या लूकची चर्चा रंगत आहे.
प्रियांशू चॉटर्जी यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने फार कमी सिनेमांमध्ये काम केलं. पण ठराविक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. ‘दिल का रिश्ता’ याशिवाय प्रियांशू याने ‘तुम बिन’, ‘आपको पेहले भी कही देखा है’, ‘मदहोशी’, ‘कोई मेरे दिल मैं हैं’, ‘भूतनाथ’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता प्रियांशू वेब सीरिजमध्ये सक्रिय असतो.