मुंबई : बाॅलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) हे भलेही आज आपल्यामध्ये नाहीत. मात्र, चाहते आजही दिलीप कुमार यांची आठवण काढतात. दिलीप कुमार यांनी बाॅलिवूडमध्ये एक अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. दिलीप कुमार यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग अजूनही आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो (Saira Banu) यांची देखील एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीसारखीच लव्ह स्टोरी आहे. मात्र, दिलीप कुमार यांच्या जाण्याने आता सायरा बानो या एकट्या पडल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सायरा बानो या त्यांच्यासोबत होत्या. विशेष म्हणजे सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या वयामध्ये खूप मोठा अंतर होता.
नुकताच आता सायरा बानो यांनी इंस्टाग्रामवर अकाऊंट काढले आहे. विशेष म्हणजे इंस्टाग्रामच्या माध्यमातून सायरा बानो या आपल्या आणि दिलीप कुमार यांच्या लव्ह स्टोरी आणि काही खास आठवणी सांगताना दिसत आहेत. इतकेच नाही तर दिलीप कुमार यांनी कशाप्रकारे प्रपोज केला हे देखील सायरा बानो यांनी सांगितले आहे.
सायरा बानो या दिलीप कुमार यांना कायमच साहब या नावाने हाक मारायच्या. फोटो शेअर करत थेट सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांनी त्यांना कशाप्रकारे प्रपोज केला हेच सांगून टाकले आहे. सायरा बानो म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी मी आणि दिलीप कुमार रात्री जुहू बीचवर फिरण्यासाठी गेलो होता आणि अचानकच पावसाला सुरूवात झाली.
मी पावसामध्ये भीजू नये म्हणून त्यांनी त्यांचे जॅकेट काढून माझ्या खांद्यावर टाकले. खरोखरच ती रात्र अत्यंत खास होती. आम्ही गाडीमध्ये बसलो असताना दिलीप कुमार यांनी मला प्रपोज केला आणि म्हणाले की, माझ्यासोबत लग्न करणार का? रात्रीची वेळ, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि तेही थेट जुहू बीचवर अशा एका खास रोमांटिक वातावरणामध्ये दिलीप कुमार यांनी सायरा बानोला प्रपोज केले.
1966 मध्ये दिलीप कुमार आणि सारा बानो यांचे लग्न झाले. या दोघांच्या वयामध्ये मोठे अंतर होते. लग्नाच्या वेळी सायरा बानो या 22 वर्षांच्या होत्या तर दिलीप कुमार हे 44 वर्षांचे होते. यावरूनच हे कळू शकते की, सायरा बानो आणि दिलीप कुमार हे दोघे एकमेकांवर किती जास्त प्रेम करत होते. या पोस्टवरून हे स्पष्ट दिसत आहे की, या पावसाच्या वातावरणामध्ये सायरा बानो या दिलीप कुमार यांनी खूप मिस करत आहेत.