Khatron Ke Khiladi 13 Winner | डिनो जेम्स याने कोरले ‘खतरो के खिलाडी 13’च्या ट्रॉफीवर नाव, मिळाले अत्यंत मोठे गिफ्ट

| Updated on: Oct 15, 2023 | 7:35 AM

खतरो के खिलाडी 13 धमाका करताना दिसले. खतरो के खिलाडी 13 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. या सीजनने मोठा धमाका नक्कीच केलाय. खतरो के खिलाडी 13 ला आता विजेता मिळाला आहे.

Khatron Ke Khiladi 13 Winner | डिनो जेम्स याने कोरले खतरो के खिलाडी 13च्या ट्रॉफीवर नाव, मिळाले अत्यंत मोठे गिफ्ट
Follow us on

मुंबई : खतरो के खिलाडी सीजन 13 (Khatron Ke Khiladi 13) धमाका करताना दिसले. अनेक प्रसिद्ध टीव्ही स्टारने शोमध्ये मोठा धमाका केला. खतरो के खिलाडी सीजन 13 ची चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ बघायला मिळाली. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मधील अनेकजण खतरो के खिलाडी सीजन 13 मध्ये धमाका करताना दिसले. ऐश्वर्या शर्मा हिच्यामुळे शोच्या निर्मात्यांवर काही गंभीर आरोप (Serious charges) देखील करण्यात आले. खतरो के खिलाडी सीजन 13 ला शेवटी विजेता मिळाला आहे.

नुकताच खतरो के खिलाडी सीजन 13 चा फिनाले पार पडला. यावेळी अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि डीनो जेम्स हे टाॅप 3 मध्ये पोहचले. या तिघांमध्ये तगडा मुकाबल बघायला मिळाला. मात्र, ऐश्वर्या शर्मा फिनालेचा स्टंट करू शकली नाही. यामध्ये थेट अर्जित तनेजा आणि डीनो जेम्स हे विजेत्याच्या रेसमध्ये पुढे निघाले.

शेवटी डीनो जेम्स हा खतरो के खिलाडी सीजन 13 चा विजेता ठरला. डीनो जेम्स याने 9 मिनिटांमध्ये स्टंट पूर्ण केला. दुसरीकडे अर्जित तनेजा याला स्टंट पूर्ण करण्यासाठी 12 मिनिट लागले. डीनो जेम्स याने आपल्या खतरो के खिलाडी 13 मध्ये सुरूवातीपासून धमाकेदार स्टंट केले. कोणाताही स्टंट करण्यास डीनो जेम्स याने नकार दिला नाही. ट्रॉफीसह डीनो जेम्स याला मारुती सुजुकीकडून स्विफ्ट कार मिळालीये.

खतरो के खिलाडी सीजन 13 मध्ये डीनो जेम्स आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये एक खास मैत्री ही नक्कीच बघायला मिळाली. या सीजनने मोठा धमाका हा नक्कीच केलाय. इतकेच नाही तर हे सीजन सुपरहिट ठरले आहे. खतरो के खिलाडी सीजन 13 टीआरपीमध्येही टाॅपलाच दिसले. चाहते आता पुढच्या सीजनची वाट पाहताना दिसत आहेत.

खतरो के खिलाडी सीजन 13 ला रोहित शेट्टी हा होस्ट करताना दिसला. रोहित शेट्टी या स्पर्धेकांसोबत मस्ती करताना कायमच दिसतो. अर्चना गाैतम ही देखील खतरो के खिलाडी सीजन 13 मध्ये सहभागी झाली. मात्र, बऱ्याच वेळा अर्चना गाैतम हिने पाण्यातील स्टंट करण्यास नकार दिला. याशोमध्येही अर्चना शिव ठाकरे याच्यावर आरोप करताना दिसली.