मॉडेलिंग,एका चित्रपटामुळे रातोरात स्टार; करोडोंची संपत्ती अन् मोठा बिझनेसमन; कोण आहे हा बॉलिवूडचा हॅंडसम हंक?

| Updated on: Dec 25, 2024 | 3:22 PM

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ज्याचा एक सुपरहिट ठरला अन् त्याला रातोरात स्टार बनवलं. या अभिनेत्याला

मॉडेलिंग,एका चित्रपटामुळे रातोरात स्टार; करोडोंची संपत्ती अन्  मोठा बिझनेसमन; कोण आहे हा बॉलिवूडचा हॅंडसम हंक?
Follow us on

आजकाल अशा अनेक सेलिब्रिटींबद्दलच्या चर्चा ऐकतो ज्यांचे सुरुवातीचे हीट ठरले पण नंतर ते फिल्म इंडस्ट्रीमधून हळूहळू गायबच झाले. काही वर्षांनी तर त्यांना ओळखणंही कठीण होतं. अशाच एका अभिनेत्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

एका चित्रपटामुळे रातोरात स्टार

2002 मध्ये या अभिनेत्याच्या एका चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. याचा एक चित्रपट एवढा तुफान चालला की रातोरात तो स्टार झाला. आजही या चित्रपटाची गाणी सर्वांची फेव्हरेट लिस्टमध्ये नक्कीच असतील. या अभिनेत्याचा एक हीट ठरल्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या पण ते सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. पण तरीही या अभिनेत्याची कोट्यावधींची संपत्ती आहे.

आज तो सगळ्यात श्रीमंत कलाकारांपैकी एक मानला जातो. आजकाल त्याची नेटवर्थ ही 82 कोटी असल्याचं म्हटलं जातं. हा अभिनेता म्हणजे डीनो मोरिया. ज्याला बॉलिवूडचा हॅंडसम हंक म्हणतात.

डीनो मोरियानं चित्रपटांपासून स्वत:ला दूर केलं

डीनो मोरियाने 1999 मध्ये ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत रिंकी खन्ना होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला. डीनो मोरियाच्या करिअरमधील अनेक चित्रपट हे फ्लॉप ठरले. त्याचा सर्वात जास्त हिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘राज’.

हा चित्रपट हिट ठरला असला तरी देखील त्या आधी डीनोनं जवळपास 20 चित्रपट दिले. ‘गुनाह’, ‘इश्क है तुमसे’, ‘बाज’, ‘दस कहानियां’ आणि ‘हॉलिडे’ सारखे चित्रपट आहेत. मात्र, हे सगळे चित्रपट फ्लॉप ठरले. एकामागे एक असे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर डीनो मोरियानं चित्रपटांपासून स्वत:ला दूर केलं आणि त्याने ओटीटीच्या जगात पदार्पण केलं.

डीनो मोरियाचे असंख्य बिझनेस अन् करोडोंची संपत्ती

डीनो मोरिया अभिनयाशिवाय बिझनेस देखील करतो. त्याचं एक रेस्टॉरंट आहे आणि काही कंपन्यांमध्ये त्यानं गुंतवणूक केली आहे. तसेच 2012 मध्ये महेंद्र सिंग धोनीसोबत त्यानं एक मर्चेंडाइजिंग कंपनी सुरु केली. त्याचं नाव ‘कूल माल’ आहे. त्याशिवाय त्याचं एक प्रोडक्शन हाउस असून ‘क्लॉकवाइज फिल्म्स’ असं त्याचं नावं आहे.

ही कंपनी त्यानं 2013 मध्ये सुरु केली. इतकंच नाही तर डीनो मोरियाचा ज्यूसचा देखील बिझनेस आहे. त्यानं मिथिल लोढा आणि राहुल जैन यांच्यासोबत मिळून ‘द फ्रेश प्रेस’ नावानं एक कोल्ड-प्रेस्ड ज्यूस ब्रॅंडची सुरुवात केली. ही कंपनी कोणत्याही मशीनच्या प्रोसेसशिवाय फळांचा ज्यूस काढते.